Thursday, June 13, 2024

अवघ्या 15 वर्षांच्या वयात रेखांनी दिला होता किसिंग सीन, घरखर्चासाठी ‘बी’ ग्रेड चित्रपटातही केले काम

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री होऊन गेल्या. काहींनी अवघा एक चित्रपट करून इंडस्ट्रीला राम राम ठोकला, तर काही अभिनेत्रींनी कष्टाने आणि जिद्दीने नावलौकिक मिळवले आहे. यातीलच एक नाव म्हणजे रेखा. ‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारो है’, ही पंक्ती ज्यांना तंतोतंत जुळते त्या म्हणजे बॉलिवूड क्वीन रेखा. खरं तर, रेखा या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, परंतु सौंदर्याच्याबाबत आजही त्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. सौंदर्याने त्यांनी लाखोंना घायाळ केले आहे. आज त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केले आहे. रेखा सोमवारी (10 ऑक्टोबर) त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी.

रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर, 1954 साली चेन्नई येथे झाला. कॉन्व्हेन्ट शाळेत त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना त्यांनी अभिनेत्री बनण्याचा विचार केला नव्हता. त्यांना नन बनायचे होते. परंतु अभिनयाचे करिअर निवडून त्या एवढ्या यशस्वी होतील हा त्यांनी विचार पण केला नसेल. (Bollywood beautiful actress rekha celebrate her birthday, let’s know about her life)

रेखा यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप चिडवले होते. ते त्यांना म्हणत होते की, “तुझे तोंड पाहिले आहे का आरशात.” परंतु जेव्हा रेखा या त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये यशस्वी झाल्या तेव्हा सगळेजण अवाक् झाले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 175 हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ‘खुबसरत’, ‘खून भरी मांग’, ‘खून और पसिना’, ‘मुक्कंदर का सिकंदर’ आणि ‘उमराव जान’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ‘सावन भादो’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यांचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या बी ग्रेड चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे.

या चित्रपटात सुनील दत्त मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या पोस्टरवरून खूप हंगामा झाला होता. या चित्रपटातून तलावात अंघोळ केल्याच्या आणि विवस्त्र पाण्यातून बाहेर येणाऱ्या सीनमुळे रेखा खूप चर्चेत आल्या होत्या.

घरची आर्थिक स्थिती नीट नसल्याने त्यांनी कमी वयातच काम करणे चालू केले होते. त्यांनी बॉलिवूडमधील ‘कामसूत्र’ या एरोटिक चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांनी काही अशा चित्रपटात देखील काम केले आहे, ज्यात त्यांच्या मर्जीशिवाय त्यांना बोल्ड सीन द्यावे लागले होते.

‘अंजाना सफर’ या चित्रपटाची शूटिंगवेळी रेखा या एका रोमँटिक गाण्याची शूटिंग करण्यास पोहोचल्या होत्या. तिथे गेल्यावर दिग्दर्शकांनी जेव्हा ऍक्शन असे म्हटले, तेव्हा मुख्य भूमिकेत असणारे अभिनेते विश्वजितने त्यांना किस करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा किसिंग सीन जवळपास पाच मिनिटांचा होता. त्यावेळी रेखा या केवळ १५ वर्षांच्या होत्या. विश्वजीतने त्यावेळी या गोष्टीवर त्यांचे मत मांडताना सांगितले की, तिची काही चूक नव्हती. यासेर उस्मानचे पुस्तक ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या अफेअरमुळे ते दोघे देखील खूप चर्चेत आले होते. असे म्हणतात की, बिग बी आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांची पत्नी जया आणि त्यांचे लग्न तुटणार होते. परंतु जया यांनी त्यांचा संसार वाचवला. रेखा यांना आयुष्यात वैवाहिक सुख मिळाले नाही, परंतु त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात खूप नाव कमावले.

हेही वाचा-
काय सांगता! विद्या बालनला खरंच झाली मुलगी? शेवटी अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
कधीही न ऐकलेला किस्सा!! ‘या’ चित्रपटात ‘तो’ सीन करताना रेखा चक्क बेशुद्ध पडल्या, पुढे काय झालं? वाचा तुम्हीच

हे देखील वाचा