Thursday, June 13, 2024

कधीही न ऐकलेला किस्सा!! ‘या’ चित्रपटात ‘तो’ सीन करताना रेखा चक्क बेशुद्ध पडल्या, पुढे काय झालं? वाचा तुम्हीच

सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील अशी अभिनेत्री ज्यांनी लक्षावधी लोकांना आपल्या रूपाने, अभिनयाने घायाळ करून टाकले होते, त्यांचे नाव म्हणजे रेखा. परंतू, रेखा यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास अजिबात सोपा नव्हता.

पाहिले तर रेखा यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षाप्रमाणे होते. बालपणात वडिलांचे प्रेम मिळु शकले नाही. काम करण्याची इच्छा नसतानाही त्याला चित्रपटांमध्ये काम करावे लागले. त्यांनी स्वतःचे घर बसवण्याचा प्रयत्न केला, ते होऊ शकले नाही. आणि ज्यांच्यावर त्यांनी प्रेम केले, तेही त्यांना मिळू शकले नाही

त्याच वेळी त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 1969मध्ये रेखा आणि विश्वजित ‘अंजना सफर’या चित्रपटात काम करत होते. या चित्रपटात एक किसिंग सीन शूट करण्यात येणार होता. जेव्हा रेखा यांना याबद्दल सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी घाबरून नकार दिला, परंतु चित्रपटाच्या टीमने खुप समजवल्यानंतर रेखा या हा किसिंग सीन करण्यास तयार झाल्या.

जेव्हा रेखा आणि विश्वजितदादा यांच्यादरम्यान हा सीन चित्रित करण्यात येत होता, तेव्हा रेखा एव्हढ्या घाबरल्या होत्या की, त्यांच्या चेहर्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ज्यामुळे हा सीन परत परत करावा लागत होता. वारंवार एकच सीन करण्याची वेळ आल्याने रेखा या चक्क बेशुध्द पडल्या होत्या.

किसिंग सीनमुळे अभिनेत्री बेशुध्द पडल्याचे हिंदी सिनेमात तेव्हा प्रथमच घडले होते. ही गोष्ट माध्यमात आगीसारखी पसरली, आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला.

जेव्हा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठविला गेला, तेव्हा त्यांनी ‘अंजाना सफर’ या चित्रपटातील हा किसिंग सीन काढून टाकण्यास सांगितले. या प्रकरणानंतर हा चित्रपट चांगलाच रखडला. मग हा चित्रपट एक-दोन नव्हे तर, तब्बल दहा वर्षानंतर 1979मध्ये ‘दो शिकारी’ या नावाने प्रदर्शित झाला.

आधिक वाचा-
अभिनेत्री संदीपा धरनेच्या बोल्डनेसने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, फोटो पाहून तुम्हाला फुटेल घाम
काय सांगता! विद्या बालनला खरंच झाली मुलगी? शेवटी अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

हे देखील वाचा