अनुराग कश्यप आणि द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. यादरम्यान, अनुराग कश्यप आता नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंटरी-सीरीज बॅड बॉय बिलियनेअर्स इंडियाचे निर्माते डिलन मोहन ग्रे यांच्यासोबत सामील झाले आहे. ऑस्कर २०२३ मध्ये भारताकडून ‘द काश्मीर फाइल्स’ पाठवण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटाला डिलनने ‘कचरा’ म्हटले आहे.
यावर्षी मार्च महिन्यात ९० च्या दशकात खोऱ्यातून हिंदूच्या पलायनावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात शांततेत आलेल्या या सिनेमाने मौखिक प्रसिद्धी मिळवली आणि या वर्षातील सर्वात हिट सिनेमा बनला. या सिनेमासोबत अनेक वादही जोडले गेले. या वर्षीतील सर्वात हिट हिंदी चित्रपट बनला. अनेक वादही त्याच्याशी जोडले गेले. काहींनी याला एकतर्फी कथा म्हटले तर काहींनी खोटे म्हटले आहे. नुकताचं सोशल मीडियावर हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘द काश्मीर फाइल्सची’ खिल्ली उडवली होती.
२०२० च्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी मालिका ‘बॅड बॉय बिलियनेअर्स इंडिया’ ने प्रसिद्धी मिळविलेल्या डिलन मोहन ग्रेने विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाला ‘कचरा’ म्हटले आहे आणि जोडले आहे की हा कोणत्याही कलात्मकतेशिवाय घृणास्पद कचरा चित्रपट आहे.
आपल्या ट्विटमध्ये डिलनने लिहिले की, होय, हा खरोखर एक द्वेषपूर्ण चित्रपट आहे, कोणत्याही कलात्मकतेशिवाय, हा एक कचरा चित्रपट आहे. तरीही बोर्डाने ऑस्करसाठी त्याची निवड केली तर ती भारतासाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट असेल. अनुराग कश्यप देशात जे काही चांगलं आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. विवेक रंजन अग्निहोत्री (vivek ranjan agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या कठीण राजकीय नाटकात अनुपम खेर ( Anupam Kher),मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी (Pallavi joshi) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आता यावर विवेक अग्निहोत्री काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागेल. आरआरआर यावर्षी २५ मार्च २०२२ रोजी रिलीज झाला होता. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर हा चित्रपट २०२२ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. आरआरआरला हॉलिवूडमध्येही खूप प्रेम मिळालं. हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स २०२२ मध्ये देखील दोनदा सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी, ‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी रिलीज झाला. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ने ३०० कोटींहून अधिक कमाई केली. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावरील चित्रपटावरही जोरदार टीका झाली आणि ‘प्रोपेगैंडा फिल्म’ असे त्याचे वर्णन करण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स गर्लफ्रेंड आलियाची ‘ही’ गोष्ट आजही मिस करतो सिद्धार्थ; ऐकून रणबीरचाही चढेल पारा
बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय पूर्णच होत नाही जन्माष्टमीचा उत्सव, पाहा यादी…