Sunday, April 14, 2024

‘पतौडी पॅलेस’मधून होणाऱ्या कमाईतून सैफला मिळत नाही एकही रुपड्या; म्हणतो, ‘मी नावालाच नवाब, सगळे पैसे’

बॉलिवूडमध्ये खान आणि कपूर हे कुटुंब खूपच प्रसिद्ध आहे. तसेच, त्यांच्या घरच्या पार्ट्या आणि वाढदिवस सगळ्यात हटकेच असतात. या कुटुंबाला शाही घराणे म्हणूनही ओळखले जात आहे. यासोबतच सैफ अली खान हा तर ‘नवाब’ असल्यामुळे त्याच्या तर प्रत्येक अदाच निराळ्या असतात. सैफ हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘भूत पोलीस’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता, तेव्हा त्याने ‘पतौडी पॅलेस’बद्दल एक रंजक किस्सा सांगितला होता. चला तर जाणून घेऊया कोणता आहे तो किस्सा…

सैफ आणि ‘पतौडी पॅलेस’बद्दलचा रंजक किस्सा
सैफ अली खान (Saif Ali Khan) याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. सैफचा जन्म 16 ऑगस्ट, 1970 या दिवशी झाला होता, तो आता 52 वर्षाचा झाला आहे. सैफ हा जेवढा चित्रपटासाठी ओळखला जातो, तेवढाच दैनंदिन जीवनासाठी देखील चर्चेत असतो. त्याचे जीवन तो अगदी जोरदार आणि मजेशीर पद्धतीने जगतो. तो नेहमी आपल्या कुटुंबाबरोबर फिरायला जात असतो. काही दिवसांपूर्वी तो कपिल शर्माच्या शोमध्ये ‘भूत पोलीस’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने ‘पतौडी पॅलेस’बद्दल एक रंजक किस्सा सांगितला होता. कपिलने सैफला विचारले होते की, तुमची ‘तांडव’ ही वेबसीरिज पतौडी पॅलेसमध्ये शूट झाली आहे, तर याचदरम्यान तुम्ही अभिनयामुळे जास्त पैसे कमवले का, पतौडी पॅलेसमुळे?

त्यावर सैफने उत्तर देत म्हटले की, “वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमार्फत शूटिंगचे जेवढे पैसे मिळतात, ते सगळे आई घेत असते, मी फक्त नावालाच नवाब आहे.”

विशेष म्हणजे, सैफ अली खान याचे आजोबा इफ्तिकार अली खान हे हरियाणाच्या पतौडी संस्थानाचे नवाब होते. सैफचे वडील मंसूर अली खान (Mansoor Ali Khan Pataudi) हे त्यांच्या काळातील ते प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक राहिले आहेत.

सैफ अली खानने 2012 मध्ये करीना कपूर (Kareena Kapoor) हिच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न केले होते. अभिनेत्याचे पहिले लग्न अमृता सिंग (Amrita Singh) हिच्यासोबत 1991मध्ये झाले होते. मात्र, हे लग्न जास्त दिवस टिकले नाही. अवघ्या 13 वर्षानंतर 2004मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला होता. सैफला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही त्यांची नावे आहेत. दुसऱ्या पत्नीकडून म्हणजेच करीनाकडून त्याला तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan) ही मुले आहेत. सध्या त्याची तैमुर आणि जहांगीर ही मुलं लहान आहेत. तसेच, सारा ही तिच्या करिअरमध्ये यशाच्या पायऱ्या चढत आहे. तिने बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘…तो चुकीचा सिनेमा बनवत आहे’, आर माधवनने सांगितले आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाचे कारण
वाचव रे देवा! मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजूची तब्येत पुन्हा बिघडली, आठवड्यापासून शुद्ध आलीच नाही
‘मग मी काय ऍबॉर्शन करू का?’ मुलीच्या जन्मानंतर ४ महिन्यातच प्रेग्नेंट राहिल्यावर ट्रॉलर्सला अभिनेत्रीचे उत्तर

हे देखील वाचा