पठडीबाहेरील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यावर देखील झाले ‘मी टू’चे आरोप


बॉलीवूडमधील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विवेक अग्निहोत्री उर्फ विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या पठडीबाहेरील चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. रोमँटिक, राजकीय, क्रीडा आदी अनेक पठडीबाहेरील विषयांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट बॉलीवूडला दिले. अग्निहोत्री यांचा आज (२१ डिसेंबर) वाढदिवस आहे. २१ डिसेंबर १९७३ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे त्यांचा जन्म झाला. विवेक सध्या त्यांच्या आगामी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी २००५ मध्ये ‘चॉकलेट डॉग सिक्रेट्स’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘मी टू’ प्रकरणात ते अडकले होते.

हे प्रकरण २०१८ चे आहे. हा तोच काळ होता जेव्हा ‘मी टू’ प्रकरणात नवनवीन खुलासे होत होते. अनेक वर्षापूर्वी घडलेले प्रकार लोकांसमोर येत होते. या प्रकरणात बॉलीवूड मधील अनेक ज्येष्ठ कलाकारांचे नाव समोर आले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण करताना तिच्यासोबत विवेक अग्निहोत्री यांनी गैरवर्तन केले असा आरोप केला होता. तनुश्रीचा आरोप होता की २००५ साली चित्रपटात एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिला कपडे काढण्यास सांगितले होते.

तनुश्री दत्ता ने एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांच्यावर आरोप केला होता की, विवेक यांनी तिला कपडे काढून सर्वांसमोर डान्स करण्यास देखील सांगितले होते. दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले असले तरी याच चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकानं मात्र हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. ‘चॉकलेट’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत असून माध्यमांनीही तिच्या विधानांना प्रसिद्धी देताना विचार केला पाहिजे.” असं सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर म्हणाले होते.

पुढे सत्यजित म्हणाले, ‘चित्रीकरणादरम्यान तनुश्रीचा गैरसमज झालेला. तिला कोणीही कपडे काढायला सांगितले नव्हते. २०० लोक सेटवर असताना असं सांगण्याची हिंमत तरी कोण करेल का?’, अशी फेसबुक पोस्ट लिहित गझमेर यांनी तनुश्रीचे आरोप तेव्हा फेटाळून लावले होते.

विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ मुळे खूप चर्चेत आले आहेत. हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार असल्याची घोषणा ट्विटरवर करण्यात आली आहे. एक पोस्टर प्रदर्शित करून अग्निहोत्री यांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली. पोस्टरवर भगव्या रंगामध्ये तारांच्या सुरक्षा कवचात जम्मू- काश्मीरचा नकाशा दिसत आहे. चित्रपटात ‘काश्मिरी पंडित’ हा मुख्य मुद्दा आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर विवेक यांनी सुप्रसिद्ध चित्रपट-नाट्य अभिनेत्री पल्लवी जोशी हिच्याशी लग्न केला आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत. ‘चॉकलेट’ शिवाय विवेकने धन धना गोल, हेट स्टोरी, जिद, बुद्धा इन ट्रॅफिक जाम असे चित्रपट बनवले आहेत.

हेही वाचा-

अनेक रियॅलिटी शोची विजेती असणाऱ्या करिश्मा तन्नाने केले ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट

अवघ्या १५ व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण केलेल्या तमन्ना भाटियाला ‘या’ सिनेमाने दिली अभूतपूर्व प्रसिद्धी

काय सांगता! सारा अली खानला तिच्या स्वयंवरात पाहिजे ‘हे’ लग्न झालेले कलाकार नावं ऐकून तुम्ही व्हाल चकित


Latest Post

error: Content is protected !!