Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जागतिक योगा दिन २०२१: योगा करत सारासह या ‘फिट ऍंड फाइन’ कलाकार मंडळींनी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

सध्याचे तणावपूर्ण आणि रोगट वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे योग. योग हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे. आज २१ जून रोजी आपण जागतिक योग दिवस साजरा करतो. आपल्या आयुष्यात योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वांनाच फायदेशीर असणाऱ्या या योगाचे महत्त्व आपल्या सर्वाना माहीतच आहे. योग नुसते आपले वजन कमी न करता आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो. योगाने फिटनेस मिळवलेल्या कलाकारांनी देखील जागतिक योगा दिन साजरा केला आहे. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सारा अली खान
आजची आघाडीची अभिनेत्री असलेल्या सारा अली खानने योगा करत असतानाचा एक फोटो शेअर करत लिहिले, “योगा हा, स्वतःसाठी, स्वतः पासून, स्वतः पर्यंतचा एक प्रवास आहे. जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा.”

अनुपम खेर
जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “योगाने मला फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या प्रत्येक परिस्थितीसोबत लढण्याचे बळ देतो. तुम्हाला जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा. योग भारताने जगाला दिलेली एक अद्भुत देणगी आहे.”

मोहनलाल
दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांनी त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “निरोगी आयुष्यासाठी योगा.”

माधुरी दीक्षित
हिंदी सिनेसृष्टीची सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने तिचा योगा करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीने एक योगासन दाखवले आहे. यावेळी तिने लिहिले की, “आज जागतिक योगा दिवस साजरा करण्यासाठी माझ्यासोबत या.”

शिल्पा शेट्टी
शिल्पाने जागतिक योग दिवसाच्या शुभेच्छा देताना श्वासाचे महत्व सांगितले आहे. याचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. सोबत तिने योगाचे अनेक फायदे सांगितले आहे.

आलिया भट्ट

 

बॉलिवूडची क्युट आणि बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टने देखील तिचा योगा करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत, सर्वाना जागतिक योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा