एकच चर्चा, पैसा वाचवलाय त्यांनी!! लॉकडाऊनचा फायदा घेत ‘या’ सेलिब्रेटींनी बांधली लगीनगाठ


या वर्षाची सुरुवात जशी कोरोनामय परिस्थितीत झाली तसंच हे वर्ष देखील आता कोरोनामय परिस्थतीतीच संपलं आहे. अगदी काही दिवसातच आता नवं वर्ष म्हणजे २०२१ चा सूर्योदय होणार आहे. असं असलं तरी काही जणांसाठी २०२० हे तसं पाहायला गेलो तर फायद्याचंच वर्ष ठरलं आहे. आपल्या लक्षात आलंच असेल की आमचा रोख कोणाकडे आहे ते. अगदी बरोबर विचार केलात आपण. २०२० हे वर्ष हे लग्नाळू मित्र मैत्रिणींसाठी अगदीच फायद्याचं ठरलं आहे. म्हणजे पहा ना करोना काळामुळे ५० ते शंभर पाहुण्यांनाच निमंत्रण देता येत होतं. लग्न देखील अगदी साध्यापद्धतीने करता येणं शक्य होतं. यामुळे लग्न समारंभांवरचा लाखोंचा खर्च कमी झाला. यातच वधू वरांच्या घरच्यांचं निम्मं टेंशन कमी झालं. मंडळी फक्त आपलेच मित्र मैत्रिणी सोडाच परंतु बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हाच विचार करून लग्नसोहळे उरकून घेतले. अहो खरंच, चला पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी…

काजल अग्रवाल आणि गौतम किचलू
सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हिने ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये व्यावसायिक गौतम किचलू याच्यासोबत लग्न केले. करोनाच्या साथीमुळे या जोडीने मुंबईतील ताज हॉटेलमध्ये विवाह सोहळा आयोजित केला होता, ज्यात फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. लग्नानंतर या जोडप्याने आपल्या मित्रांसाठी आणि कुटुंबीयांसाठी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. लग्नानंतर काजलने मालदीवमधील तिच्या हनिमूनचे अनेक फोटोज तिच्या चाहत्यांसह शेअर केले, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले.काजल आपल्याला आत्तापर्यंत हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करताना दिसली आहे. यात तिने सिंघम, मारी, मगाधीरा, मि. परफेक्ट, बिझनेस मॅन या सारख्या हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये ती आतापर्यंत झळकली आहे.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह
बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग यांचं लग्न हे सर्वाधिक चर्चित लग्न होतं. २४ ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनप्रीत हे लग्नबंधनात अडकले. ‘नेहू दा व्या’ या गाण्याच्या सेटवर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत प्रेमात पडले आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा एक महिना पूर्ण केला आहे. हिंदू आणि शीख दोन्हीही प्रथांनुसार लग्न करण्यात आले. चंदीगड आणि दिल्लीतील मित्रांसाठी विविध कार्यक्रमांच आयोजिन केलं गेलं होतं. तसंच रोहनप्रीतच्या कुटुंबीयांनीही मुंबईत रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.
नेहा कक्कर ही सध्या इंडियन आयडॉल या स्पर्धेच्या बाराव्या पर्वाचं परीक्षण ती करतेय.

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा
या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि अभिनेता कुणाल वर्मा यांनी लग्नाची घोषणा केली होती, परंतु कोरोना साथीच्या साथीमुळे कोर्टात जाऊन लग्न करावं लागलं होतं. याची माहिती या दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली. अभिनेत्री पूजा आणि कुणाल यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. दोघांनीही ही माहिती त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली. त्यानंतर चाहत्यांनी या दोघांचं जोरदार अभिनंदन केलं.

नताशा स्टानकोव्हिक आणि हार्दिक पांड्या
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पंड्याने लॉकडाऊन दरम्यान आपली प्रेयसी आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टानकोव्हिक यांच्याशी छुप्या पद्धतीने लग्न केले, त्यानंतर या दोघांचे लग्न फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. साल २०२० च्या सुरुवातीला लग्नाआधी नताशाने हार्दिक पांड्याशी साखरपुडा केला होता. दोघांनीही सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होते. लग्नानंतर लगेचच हार्दिक आणि नताशाने चाहत्यांना सांगितले की ते लवकरच पालक होणार आहेत. आणि आता नताशा आणि हार्दिकला एक मुलगा आहे. ज्याचं नाव अगस्त्य ठेवण्यात आलं आहे.

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल
बॉलिवूड गायक आदित्य नारायण याने त्याची मैत्रीण श्वेता अग्रवालशी लग्न केलं.आदित्य आणि श्वेता दोघेही गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काश्मीरमध्ये सध्या दोघेही आपला हनिमून एन्जॉय करत आहेत. याच सोबत आदित्य आपल्याला इंडियन आयडॉल या सिंगिंग रिऍलिटी शोचं सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसत आहेत.

राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटविणारा अभिनेता राणा डग्गुबाती याने आपली जुनी मैत्रीण आणि इंटिरियर डिझायनर मिहिका बजाजशी लग्न केलं आहे. अभिनेता राणा डग्गुबाती यांनी ८ ऑगस्ट २०२० रोजी हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये मिहिका बजाजबरोबर सात फेरे घेतले ज्याचे फोटो त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत. बाहुबली सिरीज, द गाजी अटॅक, लीडर, नेने राजू नेने मंत्री आशा सिनेमांमधून नायक आणि खलनायकाच्या भूमिकांमधून राणा आपल्याला दिसत असतो.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.

 


Leave A Reply

Your email address will not be published.