Monday, July 1, 2024

इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

बॉलिवूड अशी मायानगरी आहे जिथे येण्यासाठी प्रतेयेकजन स्वप्न बघत असतात. कहीजन अनेक परिस्थितींना तडा देऊन इथपर्यत पोहोचतात. तर काहीजन आपल्या पॅशनला पुढे घेऊन जाण्यासाठी या मायनगरीमध्ये उतरतात. बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग मधू झाले आहे मात्र, त्यांचा छंद त्यांना इंडस्ट्रीमध्ये घेऊन आला. भले त्यांच शिक्षण वेगळ्या क्षेत्रात झालं असलं तरी त्यांच्यावर अभिनयाचं भुत चढल्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावले. या कलाकारांच्या यादीमध्ये क्रिती सेनन पासून ते विकी कौशल पर्यत मेठ्या कलाकारांचेही नावे आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग सोडून अभिनयात करिअर बनवलं.

तापसी पन्नू
बॉलिवूडमधील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsi Pannu) हिने दिल्लीमधील गुरु तेग बहादुर इंस्टीट्युट ऑफ टोक्नॉलजी कॉलेजमधून कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आभ्यास पूर्ण केला होता. मात्र, यानंतर तापसीने अभिनय क्षेत्रामध्ये पसंती दर्शवली आणि आपल्या दमदार अभिनयाने खूपच कमी वेळात तिने चाहत्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. त्याशिवया सोशल मीडियावर तापसीचा मोठा चाहतावर्ग आहे.

विक्की कौशल
लोकप्रिय अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा अ‍ॅक्टिंगपूर्वी इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होता. त्याने राजीव गांधी इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमधून आभ्यास पूर्ण केला आहे. मात्र, अभिनेत्याने इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला सोडून चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विकीने आपल्या करिअरमध्ये कधी मागे वळून पाहिले नाही.

क्रिती सेनन
ग्लॅमरस गर्लम्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Senon) हिने देखिल बॅचलर ऑफ टेक्नोलिजीमधून डिग्री घेतली आहे. क्रितीने नोएडामधील इंस्टीट्युट टेक्नोलॉजीमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये पाय ठेवला. क्रितीने ‘हिरोपंती‘ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून पहिल्याच चित्रपटाने क्रितीने लाखो चाहत्यांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले. आजअभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

सोनू सूद
कोरोनाकाळापसून चाहत्यांचा देवमानूस म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता सेनू सूद (Sonu Sood) याने खलनायक बनून प्रेक्षकांवर राज्य केलं आहे. कलाकरापूर्वी सोनू सूदने इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याशिवाय अभिनेत्याने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमवले होते. सोनूने चित्रपटांमध्ये काम करण्यचा निर्णय घेतला. आज अभिनेता लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
याला म्हणतात प्रेम! सलमान खानला भेटण्यासाठी ‘या’ पठ्याने सायकलवर पार केले ११०० किमीचे अंतर
एका मेसेजने बदलले रोहमन शॉलचे आयुष्य, थेट मिस युनिव्हर्सच पडली होती प्रेमात

हे देखील वाचा