Tuesday, May 28, 2024

तापसी पन्नू शाहरुखसोबत जाणार सौदी अरेबियाला? जाणून घ्या किंग खानचा प्लान

बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता शाहरुख खान त्याचा ‘पठाण‘ चित्रपट खूप वेगाने पूर्ण करत आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत ताे सौदी अरेबियाला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. ‘डंकी‘ चित्रपटाची मुख्य अभिनेत्री तापसी पन्नू देखील किंग खानसोबत जाणार आहे. दोघेही तिथे राजकुमार हिरा यांनी दिग्दर्शित डंकी या चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. शाहरुख खान आज UAE मधून परतला आहे, जिथे तो दोन दिवस एका कार्यक्रमासाठी गेला होता.

सौदी अरेबियानंतर चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये हाेईल
माध्यमातील वृत्तानुसार, डंकी (donkey) चित्रपटाचे शेड्यूल 15 दिवस असू शकत. मात्र, हे अंतिम शेड्यूल नाही. सौदी अरेबियानंतर, चित्रपटाचे शूटिंग पंजाबमध्ये केले जाणार आहे, ज्यासाठी कलाकार आणि चित्रपटात काम करणारे अन्य लाेक कदाचित दुसरे वेळापत्रक आखतील.

‘डंकी’ चित्रपट 22 डिसेंबर 2023ला सिनेमागृहात हाेणार प्रदर्शित
या चित्रपटात शाहरुख (shah rukh khan) व्यतिरिक्त बाेमन इराणी (boman irani), सतीश शाह (satish shah) हे देखील आहे. जे कदाचित शेड्यूलसाठी जाऊ शकतात. डंकी चित्रपटाचे लेखन राजकुमार हिरानी(rajkumar hirani), ​​अभिजीत जोशी(abhijit joshi) आणि कनिका धिल्लन(kanika dhillon) यांनी केले आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023ला सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची योजना आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरूखने राजकुमार हिरानी यांना लिहिली नाेट
चित्रपटाच्या घोषणेवर शाहरुखने सोशल मीडियावर लिहिले की, “प्रिय राजकुमार हिरानी सर, तुम्ही तर माझे सांताक्लॉज निघाले. तुम्ही सुरुवात करा मी वेळेवर येईन. मी खरंच सेटवर असेन! तुमच्यासोबत काम करण्यासाठी नम्र आणि उत्साही आहे. 22 डिसेंबर 2023ला तुमच्या सर्वांसाठी ‘डंकी’ चित्रपट सिनेमागृहात घेऊन येत आहे.” (bollywood actress taapsee pannu to travel to saudi arabia with actor shah rukh khan know the plan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! हनी सिंग रमला आठवणीत, शेअर केले भन्नाट फाेटाे

नव्या नवेली नंदा सिद्धांतला करतेय डेट? बिग बींची नात दिसली अभिनेत्याच्या घराबाहेर

हे देखील वाचा