बॉलिवूड कलाकारांना चर्चेत येण्यासाठी विशेष कारणांची गरज नसते. ते कोणत्याही कारणांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत येतात. ते वादग्रस्त विधानांपासून ते त्यांच्या लाईफस्टाईलपर्यंत अनेक गोष्टींमुळे माध्यमांचे लक्ष वेधून घेतात. काही कलाकार तर चक्क त्यांच्या नावांमुळेही चर्चेत राहिले आहेत. खरं तर, अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी अंकशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरून त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. या यादीत उर्फी जावेदपासून ते सुपरस्टार अजय देवगण याच्यापर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. या लेखातून आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
नावाची स्पेलिंग बदलणारे १० कलाकार
१. राणी मुखर्जी
बॉलिवूडमधील दमदार आणि निर्भीड अभिनेत्रींमध्ये राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिचा समावेश होतो. राणीने तिच्या नावाची स्पेलिंग बदलली आहे. राणीने तिच्या नावाची नाही, तर तिच्या आडनावाची स्पेलिंग बदलली आहे. ती आधी Mukherji असे लिहायची, पण ती आता Mukerji असे नाव लिहिते.
२. अजय देवगण
सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) याने त्याच्या ऍक्शन आणि कॉमेडी अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अजयच्या नावाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने त्याच्या आडनावातून A हे अक्षर काढून टाकले आहे. अजयने Devgan हे नाव Devgn असे करून घेतले आहे.
३. आयुष्मान खुराना
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे सिनेमे हे चाहत्यांना कोणता ना कोणता संदेश देणारे असतात. आयुष्मानने त्याच्या नाव आणि आडनावात बदल केला आहे. आधी तो Ayushman Khurana असे लिहायचा. आता तो Ayushmann Khurrana असे लिहितो.
४. तुषार कपूर
अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) याच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. ‘गोलमाल’ या सिनेमातून चाहत्यांना हसवणाऱ्या तुषारने त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. तो सुरुवातीला Tushar Kapoor असे लिहायचा, पण तो आता Tusshar Kapoor असे लिहितो.
५. करिश्मा कपूर
नव्वदचे दशक गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिनेदेखील तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला होता. करिश्माने तिच्या नावातून H हे अक्षर काढून टाकले होते. आधी ती Karishma असे लिहायची, पण आता ती Karisma असे लिहिते.
६. उर्फी जावेद
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या कामाव्यतिरिक्त तिच्या फॅशन सेन्समुळेच जोरदार चर्चेत असते. उर्फी हिने तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एकदा नाही, तर दोनदा बदल केला आहे. ती सुरुवातीला तिचे नाव Urfi असे लिहायची. नंतर तिने Urrfii असे लिहिणे सुरू केले आणि आता ती तिच्या नावाची स्पेलिंग Uorfi असे लिहिते.
७. सुनील शेट्टी
वयाची साठी पार केलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आजही त्याच्या फिटनेसने युवा अभिनेत्यांनाही टक्कर देतो. तो ऑनस्क्रीनच नाही, तर ऑफस्क्रीनही चाहत्यांचे मने जिंकत आहे. सुनीलच्या नावाच्या स्पेलिंगबद्दल बोलायचं झालं, तर तो सुरुवातीला त्याचे नाव Sunil असे लिहायचा, पण नंतर त्याने त्याचे नाव दुरुस्त केले आणि तो आता Suniel असे लिहितो.
८. राजकुमार राव
तगड्या अभिनयाच्या जोरावर वाहवा लुटणाऱ्या अभिनेत्यांमध्ये राजकुमार राव (Rajkummar Rao) यानेही त्याच्या नावाची स्पेलिंग बदलली आहे. त्याने त्याच्या नावात M हे अक्षर जोडले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो त्याचे नाव सुरुवातीला Rajkumar असे लिहायचा, पण आता तो Rajkummar असे लिहितो.
९. जावेद जाफरी
अष्टपैलू भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांनीही त्यांच्या नावाची स्पेलिंग बदलली आहे. आधी ते त्यांचे नाव Javed Jaafery लिहायचे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नावाची स्पेलिंग Javed Jaffrey अशी केली. त्यांनी त्यांच्या नावातून A काढून F जोडले होते.
१०. रितेश देशमुख
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा त्याच्या ऑनस्क्रीन भूमिकांसोबतच त्याच्या ऑफस्क्रीन थट्टामस्करीच्या अंदाजासाठीही ओळखला जातो. रितेशनेही त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. त्याने त्याच्या नावात I अक्षर जोडले आहे. सुरुवातीला तो Ritesh असे लिहायचा. मात्र, आता तो Riteish असे लिहितो.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी