हा व्यवहार तोट्याचाच! जान्हवी कपूरचे ३९ कोटींचे अपार्टमेंट राजकुमार रावने केले ४४ कोटीला खरेदी

बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक राजकुमार राव. (rajkumar rao) त्याच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राजकुमारने मुंबईत एक आलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे. राजकुमारने हे अपार्टमेंट ४४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हे अपार्टमेंट जुहू, मुंबई येथे आहे. विशेष म्हणजे त्याने हे अपार्टमेंट अभिनेत्री जान्हवी कपूरकडून (janhavi kapoor) खरेदी केले आहे, कारण ती या अपार्टमेंटची मालकीण होती. राजकुमार आणि जान्हवीने ‘रुही’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांमध्ये उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे घर घेताना राजकुमार खूप खूश आहे. त्याचवेळी जान्हवीने ते विकून करोडोंचा नफाही कमावला आहे.

आजपासून २ वर्षांपूर्वी स्वतः जान्हवी कपूरने ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. जान्हवीने डिसेंबर २०२० मध्ये ३९ कोटी रुपयांना खरेदी केले होते. या डीलमधून जान्हवीला ५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. हे अपार्टमेंट ३४५६ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. त्याची स्क्वेअर फूट किंमत १.२७ लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात महागडी डील आहे.

या अपार्टमेंटची इमारत बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि बिल्डर आनंद पंडित यांनी बांधली आहे. या इमारतीला लोटस आर्य म्हणतात. माध्यमातील वृत्तानुसार, राजकुमार राव याने पत्नी पत्रलेखासोबत हा अपार्टमेंट खरेदी केला आहे. हे अपार्टमेंट १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या मजल्यापर्यंत आहे. या इमारतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात.

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी यापूर्वी एकाच इमारतीच्या ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर अपार्टमेंट खरेदी केले होते. राजकुमार आणि जान्हवीने दोघांनी हॉरर-कॉमेडी रूहीमध्ये एकत्र काम केले आहे, जो गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्यापैकी एक होता.

जान्हवी कपूर आणि राजकुमार रावही ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असणार आहे. याचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. हा स्पोर्ट्स ड्रामा या वर्षाच्या अखेरीस रिलीज होऊ शकतो. एक दिवसापूर्वी, जान्हवीचा ‘गुड लक जेरी’ OTT वर प्रसारित झाला आहे, ज्याला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्याच वेळी राजकुमार राव शेवटचा सान्या मल्होत्रासोबत ‘हिट: द फर्स्ट केस’मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीर सिंगने दाखवला संस्कारीपणा, शेकडोंमध्ये धरले ‘या ‘व्यक्तीचे पाय

अजय देवगणसमोरच डायरेक्टरने केलेला सैफचा बाजार, एका चापटीत चारलेली धूळ

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर श्रीजीता डेची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी पण असंच करणार’

 

Latest Post