मल्याळम इंडस्ट्रीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेते आणि कॉमेडियन उल्लास पंडलम यांची पत्नी पथनामथिट्टा येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. त्याचा मृतदेह घराच्या उघड्या टेरेसवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. उल्लास यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. यापूर्वी उल्लास यांनी पोलिस ठाण्यात पत्नी आशा हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पत्नी आशा बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी अहवालात केला होता. प्रथमदर्शनी याला आत्महत्या म्हटले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा आणि मुले रात्री वरच्या मजल्यावर झोपले होते आणि घटनेच्या वेळी उल्लास घरीच होता.
उल्लास (ullas pandalam) याने पत्नी आशा (asha) हिची बेपत्ता झाल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिस जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा आशाचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उल्लास पंडलम यांनी पोलिसांना सांगितले की, “जेव्हा तो उठला आणि पहिल्या मजल्यावर गेला तेव्हा त्याने पाहिले की, त्याची दोन मुले आणि पत्नी तेथे नाही, त्यानंतर काॅमेडियन पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला.”
पाेलिसांचा काॅमेडियन वर संशय?
मात्र, काॅमिडियन उल्लास यांनी पत्नी आशाचा घराभोवती व्यवस्थित शोध घेण्याऐवजी हरवल्याची तक्रार का दाखल केली, असे प्रश्न पाेलिस उपस्थित करत आहेत. दरम्यान, आशाचे वडील शिवनंदन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूमागे कोणताही गैरप्रकार न झाल्याचे स्पष्ट केले.
आशाच्या वडिलांनी मानसिक आरोग्याचे सांगितले कारण
आशाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, “त्यांची मुलगी आणि जावई यांचे चांगले संबंध होते आणि या जोडप्यात कोणताही वाद नव्हता. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे आशाने आत्महत्या केली असावी,” असेही त्यांनी सांगितले. उल्लास यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा कोणताही आरोप नसल्याचे त्यांनी सांगितले.(bollywood comedian ullas pandalam wife asha found dead)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फक्त सिनेमाच ब्लॉकबस्टर, 400 कोटींच्या ‘कांतारा’च्या कलाकारांना दिले फक्त ‘एवढे’ मानधन; आकडा करेल हैराण
‘गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही, आज तो सर्वात मोठा सुपरस्टार असता’, रोहित शेट्टीचे भाष्य