जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

Juhi Chawla's daughter Janhvi Mehta will enter in Bollywood


बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही 90 च्या दशकातील एक सुपरहिट अभिनेत्री आहे. ब्युटी पेजेंट आणि मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ती नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप कमी जणांना माहिती असेल. जुही चावलाला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि मुलगी आहे. तिच्या मुलीचे नाव जान्हवी मेहता आहे.

जान्हवी ही कॅमेरा आणि सोशल मीडियापासून खूप लांब राहते. यामुळेच तिच्याबद्दल जास्त लोकांना माहित नाहीये. एका मुलाखतीत जुहीने तिच्या मुलीच्या करिअरबद्दल सांगितले होते. त्यांनतर ती खूप चर्चेत आली. जुहीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या मुलीला जान्हवीला अभ्यास करण्याची खूप आवड आहे. जान्हवीला लेखक बनायचे होते, पण त्यांनतर तिने मॉडेल बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यावेळी जुहीने सांगितले होते की, जान्हवी अभिनेत्री बनण्याचा देखील विचार करत आहे. ही गोष्टीबद्दल तिने सांगितले होते की, जान्हवी आता तिच्या करिअरबाबत जास्त गंभीर नाहीये. परंतु आता येणारा काळच सांगेल की, जान्हवी चित्रपटात येईल की नाही?

जान्हवी मेहता ही जुही चावला आणि यश मेहता यांची मोठी मुलगी आहे. तिने आंतरराष्ट्रीय शाळेतून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2019 मध्ये जुहीने जान्हवीच्या शाळेतील एका फेअरवेल मधील फोटो शेअर केला होत. त्यावेळी पहिल्यांदा जान्हवीला सगळ्यांनी पाहिले होते. या आधी देखील तिने जान्हवीच्या लहानपणीचे फोटो शेअर केले होते.

जान्हवीला आयपीएल मॅचच्या दरम्यान स्पॉट केले होते, तेव्हा ती शाहरुख खानच्या मुलासोबत दिसली होती. त्यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. शाहरुख खान, जुही चावला आणि तिचे पती यश मेहता हे आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या टीमचे मालक आहेत.

जान्हवी मेहता ही सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते, पण जुही तिच्या मुलांसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

-लय भारी! अभिनेता सोनू सूदच्या टीमने वाचवले बंगळुरूमधील २२ कोरोना रुग्णांचे जीव, रात्रभर केला ऑक्सिजनचा पुरवठा

-मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का! अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन, सुशांतच्या ‘छिछोरे’ चित्रपटात केले होते काम


Leave A Reply

Your email address will not be published.