बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक असणाऱ्या बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बर हीचे अल्पशा आजारामुळे नुकतेच निधन झाले आहे. मीडियामधील माहितीनुसार श्वेता यांचे २२ जुलै रोजी निधन झाले आहे. मागच्याच वर्षी बी सुभाष यांच्या पत्नीचे निधन झाले होते आणि आता यावर्षी मुलीच्या झालेल्या निधनामुळे बी सुभाष अतीव दुःखात आहे.
श्वेता बब्बर यांनी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार १९ जुलै रोजी श्वेता या त्यांच्या घरात पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे त्यांना समजले की, त्यांच्या पाठीमध्ये क्लॉटिंग झाले असल्याचे समजले. याच क्लॉटिंगमुळे त्यांच्या शरीरात इतर अवयवांना मिळणार रक्तप्रवाह खंडित झाला. दरम्यान तीन दिवस त्यांनी उपचार घेतला मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि २२ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. वयाच्या जेवलं ४८ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान बी सुभाष यांच्या पत्नीचे तिलोत्तमाचे मागच्यावर्षी निधन झाले. त्या अनेक गंभीर आजारांशी सामना करत होत्या. ७९ वय असलेले बी सुभाष हे दोन मुली आणि एका मुलाचे वडील आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास १८ चित्रपटांची निर्मिती केली. यातला एक सिनेमा म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’. या सिनेमानेच मिथुन यांना मोठी प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली. त्यांनी बॉलिवूडमध्ये आर्थिक मदतीसाठी याचना केल्यानंतर सलमान खान आणि मिथुन यांनी त्यांना मदत केली होती.
अधिक वाचा –
“आपलं उत्तरदायित्व समजून…” अभिनेता हार्दिक जोशीने मुख्यमंत्रांच्या ‘त्या’ कृतीचे केले भरभरून कौतुक
…बंधनात अडकलो! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा दणक्यात साखरपुडा संपन्न, फोटो झाले व्हायरल