Thursday, September 28, 2023

…बंधनात अडकलो! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा दणक्यात साखरपुडा संपन्न, फोटो झाले व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वात सध्या प्रेमाचे वारे वाहत आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देत त्यांच्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितले आहे. यातच चुलबुली अभिनेत्री असलेल्या स्वानंदी टिकेकरचा देखील समावेश आहे. आपल्या अभिनयाने, गाण्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारी स्वानंदी तरुण पिढीमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून हीच स्वानंदी कमालीची चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या जोडीदाराचे नाव सांगितले आणि लगेचच तिचा साखरपुडा झाल्याची बातमी येऊन धडकली आहे.

हो दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री असलेल्या स्वानंदी टिकेकरचा नुकताच दणक्यात साखरपुडा पार पडला आहे. स्वानंदीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, ते कमालीचे व्हायरल झाले आहे. स्वानंदीने जेव्हा तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा पासूनच दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांचा साखरपुडा उत्साहात संपन्न झाला आहे. स्वानंदीने गायक आणि इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णीसोबत साखरपुडा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi ???? (@swananditikekar)

स्वानंदीने तिच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यावर तिच्या मैत्र मैत्रिणींसोबतच इंडस्ट्रीमधील कलाकारांनी आणि फॅन्सने अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. तिने “…आणि आम्ही बंधनात अडकलो”, असे कॅप्शन देत आपल्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. या दोघांच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, स्वानंदी आणि आशिष यांनी ट्विनिंग केल्याचे आपल्याला फोटो पाहून लक्षात येईल. स्वानंदीने आकाशी रंगाची साडी नेसलेली दिसत असून, त्याचा रंगाचा जॅकेट आशिषने घातलेला दिसत आहे.

दरम्यान स्वानंदी आणि आशिष यांची प्रेमकहाणी नक्की सुरु कशी झाली तर कुठे भेटले याबद्दल काहीच माहिती नसली तरी त्यांना जोडणारा संगीत हा एक महत्वाचा भाग असेल हे नक्कीच. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी असून, तिने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक प्रोजेक्टचा भाग होती. तर आशिष हा गायक असून, त्याचा बँड आहे. तो इंडियन आयडलमध्ये देखील झळकला आहे.

अधिक वाचा –
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायक मुकेश यांच्या १०० व्या जयंती दिनी पंतप्रधानांनी ट्विट करत काढले गौरवोद्गार म्हणाले…
लवकरच आई होणाऱ्या स्वरा भास्करने तिचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत केले बेबी बंप फ्लॉन्ट, नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा