आजच एकविसावे शतक हे हटके आयटम साँगने भरलेले आहे, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही. कोणताही चित्रपट हा गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. चित्रपटात, कथा अशीच सुरू राहते, परंतु गाणी मध्यभागी त्यास आणखी मनोरंजक बनवतात. बॉलिवूडमध्ये आजपर्यंत देशसेवेवर ‘तिरंगा’, ‘बॉर्डर’, ‘चायना गेट’, ‘टॅंगो चार्ली’, ‘राजी’, ‘केसरी’ असे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामधील ‘ए जाते हुए लम्हों’, ‘ए वतन, वतन मेरे आबाद रहे तू’, यांसारखी अनेक गाणी सुपर डुपर हिट झाली. पण २००४ मध्ये असा एक चित्रपट येऊन गेला. ज्यातील एका गाण्याने सगळ्या गाण्यांचा एक रेकॉर्ड मोडला. अशा एका गाण्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठे गाणे कोणते आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर, २००४ मध्ये रिलीझ झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ’ या चित्रपटातील “अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ” हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे गाणे आहे.
आतापर्यंत कोणीही हा विक्रम मोडला नाही. या प्रतिष्ठित गाण्याची लांबी सुमारे १५ मिनिटे आहे, आणि हे गाणे चित्रपटाच्या ३ वेगवेगळ्या क्रमांमध्ये चित्रित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, बॉबी देओल आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. शक्तीमान तलवार दिग्दर्शित हा बॉलिवूडमधील युद्ध चित्रपट आहे.
या गाण्याने जनतेमधे देशप्रेम जागृत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून या चित्रपटाला जबरदस्त यश मिळालं. हे गाणे अलका याग्निक यांनी गायले होते, तर अनु मलिक यांनी संगीत दिले होते.
याव्यतिरिक्त लांब गाण्यांमध्ये ‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘संदेसे आते है’ या गाण्याचाही समावेश होतो. या गाण्याची लांबी तब्बल १० मिनिटे आहे. यासोबतच लांब गाण्यांमध्ये ‘सुनो जी दुल्हन’ (११.३८ मिनिटे), ‘अंताक्षरी’ (९.०८ मिनिटे) आणि ‘पिया तोसे नैना लागे रे’ (८.२८ मिनिटे) यांसारख्या गाण्यांचाही समावेश होतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-