हिंदी चित्रपट जगतातील उगवत्या तारेपैकी एक असलेल्या दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत, त्यामुळे ते आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. आता अशी माहिती समोर येत आहे की, या ज्येष्ठ कलाकाराच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांचे हिट चित्रपट 10 आणि 11 डिसेंबर रोजी फिल्म हेरिटेज फाऊंडेशनमध्ये दाखवले जाणार आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 आणि 11 डिसेंबर रोजी देशभरातील 27 शहरांमधील PVR सिनेमागृहांमध्ये त्यांचे अविस्मरणीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशा प्रकारे दिलीप साहेबांची 100 वी जयंती साजरी केली जाणार आहे. हेरिटेज फाऊंडेशनने घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना, अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी लिहिले की, “आम्ही फिल्म हेरिटेज फाऊंडेशनमध्ये 10 आणि 11 डिसेंबर रोजी माझे आदर्श दिलीप कुमार यांचा 100 वा वाढदिवस साजरी करत आहे.
बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे गेल्या वर्षी 7 जुलै 2021 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप साहेबांनी आपल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळाच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. त्यांनी 1944 मध्ये अमिया चक्रवर्ती यांच्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. मात्र 1947 मध्ये आलेल्या ‘जुगनू’ या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी ‘शहीद’, ‘मेला’, ‘बाबुल’, ‘देवदास’, ‘नई दौर’, ‘मुगल-ए-आझम’, ‘गंगा जमुना’,’राम और श्याम’, ‘कर्मा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिलीप कुमार यांना त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल भारताकडून पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिग्गज अभिनेते उमेश मेहरा यांच्या 1998 मध्ये आलेल्या ‘किला’ चित्रपटात शेवटचे दिसले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रेखानेही महत्त्वाची भूमिका साकारली होती. (bollywood famous actor dilip kumar 100th birth anniversary tragedy king memorable films to be screened in theaters for two days on dilip kumar 100th birth anniversary )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाॅकिंग! रणबीर कपूर यापुढं नाही करणार एकही राेमॅंटिक चित्रपट, सांगितल ‘हे’ कारण
‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप