सारा अली खान आणि विजय देवरकोंडा बॉलिवूडचे नवे लव्हबर्ड? पुन्हा एकदा दिसले एकत्र, पाहा फोटो

Bollywood Famous Actress Sara Ali Khan And Vijay Deverakonda Get Clicked At Manish Malhotra House Party


सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. मग ते आपल्या नवीन सिनेमामुळे असो किंवा आपल्या लग्नामुळे असो किंवा मग आपल्या अफेयरमुळे. अशाच कलाकारांमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानचाही समावेश झाला आहे. ती आपल्या ‘कुली नंबर वन’मुळे नुकतीच चर्चेत आली होती. त्यानंतर ती काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. यानंतर तिने आता पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष वेधले आहे. ती दाक्षिणात्य सुपरस्टारसोबतच्या आपल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

सारा अली खानने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत आपला एक फोटो शेअर केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा दोघांनाही स्पॉट करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सारा आणि विजयच्या जोडीबद्दल चर्चा रंगताना दिसत आहेत.

खरं तर मागील काही दिवसांमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने एका हाऊस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत सारा अली खानही पोहोचली होती. साराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर विजयसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. यानंतर जेव्हा ही जोडी मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये दिसली, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, सारा आणि विजय यांच्या जोडीने मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. ते पूर्ण पार्टीमध्ये एकसोबत दिसले होते. त्यांची वाढती जवळीक पाहून, दोघांमध्ये काही सुरू तर नाही ना?, असे अंदाज बांधले जात आहेत.

विजय देवरकोंडा आपल्या ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सारा अली खानला विजयसोबत काम करायचे आहे. यासोबतच विजयला आपल्या चित्रपटात घेणारा करण जोहरही मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये सामील झाला होता.

मनीषच्या पार्टीतून घराबाहेर पडताना सारा अली खान आणि विजय देवरकोंडा एकसोबत दिसले होते. यावेळी सारा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तर विजय कॅज्युअल ड्रेसमध्ये होता.

करणच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या ‘लायगर’मध्ये विजय एका बॉक्सरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडेही झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत.

याव्यतिरिक्त विजयच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘डिअर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’, ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु भाषिक हिट चित्रपटांमध्येही झळकला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.