अभिनेत्री सारा अली खाने बोल्ड फोटोशुट, चाहत्यांच्या एकरा लाख लाईक्स आणि हजारो कमेंट्स


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान एका फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे. साराचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग हे चित्रपट जगातील नामांकित कलाकार आहेत. साराने अल्पावधीतच चित्रपट जगतात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साराने आत्तापर्यंत बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर तिच्या अभिनयाचे प्रेक्षक नेहमी कौतुक करत असतात.

सारा सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते. ती बऱ्याच वेळा तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. दरम्यान, सारा अली खानचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये साराच्या चाहत्यांना तिचा ग्लॅमरस लूक बघायला मिळाला.

खरंतर, साराने नुकतेच एली इंडिया मासिकासाठी एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये सारा वेगवेगळ्या आउटफिटमध्ये पोज करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दिलेल्या प्रत्येक पोजमध्ये चाहत्यांना तिचा ग्लॅमरस लूक बघायला मिळातोय.

फोटोंमध्ये सारा पूर्णतः काळ्या आउटफिटमध्ये तर कधी विविधरंगी आउटफिटमध्ये दिसली आहे. या फोटोशूटचा एक व्हिडिओही आहे ज्यामध्ये ती घोड्यासोबत तर कधी शेताच्या मध्यभागी बोल्ड अंदाजात पोज देताना दिसत आहे.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटात सुशांतसिंग राजपूतसोबत मुख्य भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील साराच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक झाले होते. यानंतर ती ‘सिम्बा’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

साराने शेवटचा सिनेमा हा ‘कुली नंबर 1’ केला आहे. यात ती वरुण धवनसोबत रोमांस करताना दिसली. वरुण आणि साराचा हा चित्रपट अभिनेता गोविंदाच्या ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक होता. तथापि, समीक्षकांकडून व प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अतिशय वाईट प्रतिसाद मिळाला.

त्याचबरोबर सारा तिच्या आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटाविषयी बरीच चर्चेत आहे. या चित्रपटात ती खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. २५ वर्षीय साराचे आतापर्यंत केदारनाथ, कुली नंबर १, लव्ह आजकल आणि सिंबा हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.