Tuesday, July 9, 2024

‘कट कट कट’, म्हटले तरीही किस करायचे थांबले नाहीत ‘हे’ कलाकार; दीपवीर तर सुसाट सुटलेले

आतापर्यंत आपण ऐकलं असेल की, दिग्दर्शक म्हणजे सर्वकाही. तो जी सांगेल, तीच उगवती दिशा असते. मग कलाकारांची निवड असेल, शूटिंगसाठी लोकेशन असेल, सीन कसा शूट करायचा असेल. हे आणि बरंच काही. काहीवेळा कलाकारही आपल्या कल्पना दिग्दर्शकाला सुचवतात. त्यावर दिग्दर्शकही विचार करून कामामध्ये तसा बदलही करतात, पण हाईट तर तेव्हा होते जेव्हा एखादा इंटिमेट किंवा किसींग सीन असतो. अशा सीनवेळी कलाकार जोड्या दिग्दर्शक कट म्हणल्यानंतरही आपलंच खरं करून दिग्दर्शकाच्या सुचना फाट्यावर मारतात. अशा कोणत्या कलाकार जोड्या आहेत ज्यांनी दिग्दर्शकाने कट म्हणल्यानंतरही एकमेकांना किस करतच राहिले, चला तर पाहूया…

रेखा आणि विश्वजीत
रेखा यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या 25 Years of A Special Women या पुस्तकात उल्लेख आहे. १९६९मध्ये आलेल्या ‘अंजाना सफर’ सिनेमाच्या शूटिंगवेळी एका सीनदरम्यान, दिग्दर्शकाने ऍक्शन म्हणताच, अभिनेते विश्वजीत यांनी रेखांसोबत इंटिमेट सीन सुरू केला होता. पुस्तकानुसार जेव्हा हे सर्व घडत होते, तेव्हा सिनेमाचे कलाकार आणि क्रू सेटवर उभे होते आणि टाळ्या वाजवत होते. दिग्दर्शक राजा नवाथे १५ वेळा कट म्हणाले, पण विश्वजीत रेखांना किस करतच राहिले. तब्बल ५ मिनिटे ते रेखांना किस करत होते. त्यावेळी १५ वर्षांच्या असलेल्या रेखा थेट बेशुद्ध झाल्या होत्या.

विनोद खन्ना- डिंपल कपाडिया
ऐंशीच्या दशकात विनोद खन्ना त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते. त्यावेळी विनोद खन्ना डबल शिफ्टमध्ये काम करायचे. रात्रीच्या शिफ्टमध्ये त्यांना त्यांच्या १९८७ सालच्या ‘प्रेम धरम’ सिनेमासाठी डिंपल कपाडियासोबत एक इंटिमेट सीन शूट करायचा होता. या सिनेमाचे दिग्दर्शन करत होते महेश भट्ट. महेश भट्ट म्हणल्यावर त्यांचा सिनेमाचा विषय काय असेल, हे नव्यानं सांगायची गरज नाही. असो, त्यांनी कट म्हणल्यानंतरही विनोद खन्ना त्या सीनमध्ये एवढं डुंबले होते की, ते डिंपलला सतत किस करत होते. असं म्हटलं जातं की, त्यानंतर डिंपलने विनोदसोबत काम करण्यास नकार दिला होता.

विनोद खन्ना- माधुरी दीक्षित
विनोद खन्ना यांनी फक्त डिंपलसोबतच नाही, तर माधुरी दीक्षितसोबतही इंटिमेट सीन दिला होता. ८०-९० साली माधुरी दीक्षितनं आपल्या अभिनयानं सर्वांना वेड लावलं होतं. १९८८ साली रिलीझ झालेल्या ‘दयावान’ सिनेमातील ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान विनोद खन्नांचं स्वत:वरील नियंत्रण सुटलं होतं. ते माधुरीला किस करतच राहिले होते. त्यामुळे माधुरीही त्यांच्यावर चांगलीच नाराज झाली होती.

सिद्धार्थ मल्होत्रा- जॅकलिन फर्नांडिस
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलिन फर्नांडिस यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांना २०१७ साली रिलीझ झालेल्या ‘अ जेंटलमन’साठी सिनेमासाठी एक इंटीमेट सीन शूट करायचा होता. त्यांचा किसींग सीनने मीडियात चांगलीच खळबळ माजवली होती. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शकांनी ‘कट’ म्हटल्यानंतरही दोघे एकमेकांना किस करतच होते.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण
खऱ्या आयुष्यातही आणि पडद्यावरही किसींग सीन देणाऱ्या जोडीमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा समावेश होतो. २०१२ साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या सिनेमात दोघंही काम करत होते. सिनेमातील ‘अंग लगा दे’ या गाण्याची शूटिंग सुरू होती. गाण्याच्या शेवटी या दोघांमध्ये एक किसींग सीन होता. या सीनचे शूटिंग चालू होते. त्यारात्री सेटवर ५० क्रू मेंबर हजर होते. या सीनचे शूट झाले आणि दिग्दर्शकाने कट म्हटले, पण कुणाचीही पर्वा न करता हे दोघेही एकमेकांना किस करतच राहिले. स्टेजवर उपस्थित क्रू मेंबर त्यांच्याकडे बघतच राहिले होते. यानंतर सर्वांना समजलं की, या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे. पुढे त्यांनी नोव्हेंबर, २०१८ मध्ये लग्नाची गाठ बांधली.

तर हे होते दिग्दर्शकाने कट म्हणल्यानंतरही किस करत राहणारे बॉलिवूड कलाकार.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या गंगूबाईने थेट पंतप्रधान नेहरूंनाच केले होते लग्नासाठी प्रपोज, पुढे जे घडलं…
राज कपूरांनी संधी देऊनही मागच्या दारातून हेमा मालिनीने ठोकली होती धूम! तरीही सिनेमा ठरला सुपरहिट
एक- दोन नाही, तर तब्बल ५ लाख शेतकरी होते ‘या’ सिनेमाचे निर्माते, प्रत्येकाने दिलेलं २ रुपयांचं कर्ज

हे देखील वाचा