Tuesday, September 26, 2023

सनी देओलने केले भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन; रोहित शर्माचा फोटो शेअर करत म्हणाला…

बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेट यांचे खूप जवळचे संबंध असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. बॉलीवूड अभिनेत्रींनी अनेक क्रिकेटर सोबत विवाह केला आहे. त्यामुळे बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. नुकतीच ‘अशिया चषक 2023’ची स्पर्धा पार पडली. यादरम्यान ‘गदर 2′ स्टारर सनी देओलने एक वक्तव्य केला आहे. जे सध्या सोशल मीडियावर चांगलं चर्चेचा विषय ठरत आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील चौथ्या सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने सामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेच्या दावादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र पाहिला मिळाले. आशिया चषक 2023ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याची पाहायला मिळाली. भारताने पाकिस्तान आणि श्रीलंके विरुद्धचे दोन सामने जिंकले. त्यानिमित्ताने बॉलीवूडचा ‘तारा सिंग’ म्हणजे सनी देओलने ( Sunny Deol ) भारतीय संघाचे भरभरून कौतुक केले आहे.

भारत विजयी झाला यानिमित्ताने तारासिंग ने मोठा आनंद व्यक्त केला. तसेच त्यावेळी तारा सिंग हिंदुस्तान जिंदाबाद हा नारा देताना दिसला. सनी देवल ने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूचे अनेक फोटो शेअर केले आहेत यादरम्यान तो त्याच्या ‘गदर 2’ (gadar 2) चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

सनि देओलने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) पहिला फोटो शेअर केला आहे . यामध्ये तो क्रिकेटर कुलदीप यादवला मिठी मारताना दिसत आहे. त्याचवेळी त्याने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल शानदार शतकानंतर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

 ही पोस्ट शेअर करताना सनी देओल ने कॅप्शन मध्ये लिहिले की, “मॅच टीव्हीवर असो किंवा सिनेमातील ‘गदर 2मध्ये असो. हिंदुस्तान जिंदाबाद था , हिंदू हिंदुस्तान जिंदाबाद है , और हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा. भारतीय क्रिकेट टीमला खूप खूप शुभेच्छा. ” सनी देओलची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली चर्चेचा विषय ठरत आहे.( bollywood gadar 2 Actor sunny deol wished indian cricket team win match against pakistan in asia cup 2023 says hindustan zindabad)

अधिक वाचा-
लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक सराफ ढसाढसा रडले ; पाहा व्हिडिओ
‘वेलकम 3’ चित्रपटातून बाहेर पडल्याबद्दल नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी खूप…’

हे देखील वाचा