‘गदर 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे, त्यामुळे चित्रपटाने रेकॉर्ड तोडून कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटण्यासोबतच सनी देओल चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही चुकत नाहीये. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धर्मेंद्र 87 वर्षांचे आहेत. धर्मेंद्र आणि सनी देओल जवळपास 20 दिवस अमेरिकेत राहणार आहेत. ‘धरम जी आता 87 वर्षांचे आहेत आणि त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आहेत, त्यामुळे सनीने त्यांना उपचारासाठी अमेरिकेला नेण्याचा निर्णय घेतला. ते 15 ते 20 दिवस अमेरिकेत किंवा उपचार चालू राहतील तोपर्यंत राहतील. काळजी करण्यासारखे काही नाही.’
नुकताच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र दिसले होते. या चित्रपटात त्यांचा आणि शबाना आझमी यांचा रोमान्स देखील पाहायला मिळाला आहे. ते लवकरच शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या पुढच्या चित्रपटातही दिसणार आहे. त्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट यावर्षी ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सलग पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चाच डंका, केली एवढ्या कोटींची कमाई
‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…
‘जवान’च्या यशावर अक्षय कुमारने दिल्या शुभेच्छा; शाहरुख म्हणाला, ‘तू प्रार्थना केली होती मग..’