Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड जावेद अख्तरांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत माेठं वक्तव्य; म्हणाले, “महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…”

जावेद अख्तरांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत माेठं वक्तव्य; म्हणाले, “महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…”

प्रसिद्ध कवी, गीतकार आणि चित्रपट पटकथा लेखक जावेद अख्तर त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. जावेद अख्तर अनेक सामाजिक, राजकिय मुद्दयांवर आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. अलिकडेच त्यांच्या जीवनावर ‘जादूनामा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर ‘मुस्लीम पर्सनल लॉ’वर बाेलले.

जावेद अख्तर ( javed akhtar) यांनी मुस्लिम पर्सनल लॉ पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. जावेद अख्तर म्हणाले, “जर मुस्लिम पतींना एकाच वेळी 4 विवाह करण्याचा अधिकार असेल, तर महिलांनाही अनेक पती ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे.” जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “एकावेळी एकापेक्षा जास्त विवाह करणे हे देशाच्या कायद्याच्या आणि राज्यघटनेच्या नियमांच्या विरोधात आहे.”

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “कॉमन सिविल कोडचा असा अर्थ नाही की, सर्व समुदायांसाठी एकच कायदा असावा. उलट याचा अर्थ स्त्री-पुरुष समानता असाही होतो. दोघांसाठी समान निकष असले पाहिजेत.” अख्तर म्हणाले, “ते आधीपासूनच कॉमन सिविल कोडचे पालन करत आहेत. ज्याच्याही मनात स्त्री-पुरुष समानतेचा विचार आहे. त्याने कॉमन सिविल कोडमध्ये राहायला हवे.” ते पुढे म्हणतात की, “ते आपल्या मुलाला आणि मुलीला मालमत्तेत समान अधिकार देईल.”

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “आज देशाची समस्या अशी आहे की, देशाला सरकार आणि सरकारला देश मानले जात आहे. सरकारे येतात आणि जातात, पण देश कायम राहील. जर कोणी सरकारचा विरोध केला, तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. असे होऊ नये. देशाचा मूड फार पूर्वीपासूनच लोकशाहीचा आहे. हजारो वर्षांपासून देशातील जनतेची मनस्थिती उदारमतवादी आहे. ते कधीच कट्टरतावादी हाेऊ नये.

जावेद अख्तर यांच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘सीता और गीता’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ यासारख्या दमदार चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.(bollywood Indian poet javed akhtar said on personal law then women should also have the right to have many husbands at once)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
विश्वचषक सामना पाहण्यास कतारमध्ये पोहोचली अडल्ट स्टार, बोल्ड कपड्यांमुळे अटक?
लकी अलींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा, दिग्गज गायकाने मदतीसाठी घेतली डीजीपींकडे धाव

हे देखील वाचा