Tuesday, January 31, 2023

लकी अलींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा, दिग्गज गायकाने मदतीसाठी घेतली डीजीपींकडे धाव

लोकप्रिय गायक लकी अली सध्या एका समस्येचा सामना करत आहे, जी त्याने आता त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. देशाला अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या लकी अली यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गायकानी आपली समस्या पोलिसांना सांगून मदतही मागितली. मात्र, त्यांच्या तक्रारीनंतरही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांची थंड वृत्ती पाहून आता लकी अलीने डीजीपी कर्नाटक यांना आपली समस्या सांगितली आहे.

लकी अली (lucky ali) यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बंगळुरूमधील जमिनीवर भूमाफियांकडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले जात आहे. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण कर्नाटक डीजीपींसमोर ठेवलं असून त्यांना मदतीची विनंती केली आहे. लकी अलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “भूमाफिया बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने त्यांच्या जमीनीवर ताबा करत आहे. याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांना पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही.”

ज्या जमिनीबद्दल हा वाद समाेर आला आहे, त्या जमिनीवर लकी अली हे गेल्या 50 वर्षांपासून राहत आहेत. कारण, सध्या ते दुबईत आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी डीजीपींकडे हे बेकायदेशीर काम थांबवण्याची विनंती केली आहे. गायकाने कर्नाटक डीजीपीला लिहिलेल्या तक्रारीचा तपशील सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे.

तक्रारारीचा तपशील शेअर करत गायकाने जमिनीचा कायदेशीर ताबा आणि कागदपत्र आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचे स्पष्ट केले आहे. गायकाच्या या पोस्टमुळे त्यांचे चाहते त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि या प्रकरणात त्यांना पाठिंबा दिला आहे.

लकी अली यांच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘ना तुम जानो ना हम’, ‘कितनी हसीन है जिंदगी’, ‘सफरनामा’, ‘एक पल का जीना’, ‘आ भी जा आ भी जा’ यासारखे अनेक दमदार गाणे बाॅलिवूला दिली. (bollywood singer lucky ali says his bengaluru property encroached with the help of ias officer asks for help)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली
अक्षया लग्न पुण्यात करण्यामागचा पहिला विचार सांगत म्हणाली, ‘जेव्हा ठरलं की….’

हे देखील वाचा