Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘असा’ जुगाड तुम्ही कधीही पाहिला नसेल! अक्षय कुमारने जॅकलिनचा हेलिकॉप्टरमधील व्हिडिओ केला शेअर

‘असा’ जुगाड तुम्ही कधीही पाहिला नसेल! अक्षय कुमारने जॅकलिनचा हेलिकॉप्टरमधील व्हिडिओ केला शेअर

अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या यशानंतर आता आणखी एका सुपरहिट चित्रपटाची तयारी करत आहे. अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा हे ‘रामसेतू’ या चित्रपटात काम करणार आहेत. ते या चित्रपटाचे शेड्युल शूट करायला निघाले आहेत. जाताना या चित्रपटाची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची हेअर स्टाईल बघून तो हैराण झाला आहे. त्याला जॅकलिनचा हा अंदाज एवढा आवडला आहे की, त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्षय कुमार दमणमध्ये ‘रामसेतू’ चित्रपटाची शूटिंग करणार आहे.

अक्षय कुमारने जॅकलिनचा हा व्हिडिओ शेअर करून हे सांगितले आहे की, हेलिकॉप्टरमध्ये केस कसे कुरळे करायचे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, चॉपरच्या खिडकीत जॅकलिन केस ठेवते आणि हवेमुळे ते केस एकदम सेट होतात. असे करून तिने दोन्ही बाजूचे केस कर्ल केले. (Bollywood Jacqueline Fernandez curling hair on mid helicopter akshay Kumar is amazed see video)

अक्षय कुमार जॅकलिनचे हे टॅलेंट पाहून एकदम हैराण झाला. अक्षयने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की, “महिलांनो, जॅकलिन जुगाडूच्या सौजन्याने हेलिकॉप्टरमध्ये केस कुरळे करण्याची आयडिया मिळाली आहे. यासोबत त्याने हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे.

अक्षय कुमारच्या आगामी ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टिझर खूप सुंदर आहे. शूर सरदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. ती पृथ्वीराज यांच्या पत्नीची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे तिचा लूक अगदी राणीसारखा दिसत आहे. तसेच सोनू सूद आणि संजय दत्त हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच जॅकलिनचे ‘कुसू कुसू’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील जॅकलिनची स्टाईल आणि डान्स सगळ्यांना खूप आवडला आहे. तिच्या या डान्सचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पूजा हेगडे मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो शेअर करत म्हणाली, ‘एक सामान्य मुलगी…’

-‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

-अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’

हे देखील वाचा