हाय गर्मी! लाल रंगाचा ड्रेस घालून जान्हवीनं वाढवला इंटरनेटचा पारा, चाहते पुन्हा घायाळ


बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसुद्धा आई श्रीदेवीप्रमाणेच खूप सुंदर आहे. सामान्यत: असे मानले जाते की, चित्रपटातील सेलिब्रिटी केवळ महागडे आणि ब्रँडेड कपडेच घालतात. काही स्टार्स असे करतात, पण काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या बजेटच्या ड्रेसमध्येही अत्यंत आकर्षक दिसतात. जान्हवीने नुकतेच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या हॉट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपल्या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं असून चाहत्यांनाही पुन्हा एकदा घायाळ केले आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर जान्हवीने फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी तिने न्यूड मेकअप केला होता. जान्हवीचे खुले केस आणि सिल्वर रंगाचे कानातले तिच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालत आहेत. जान्हवीची ही स्टाईल पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

तिने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘वसंत ऋतूमध्ये चेरी.’ आतापर्यंत या फोटोला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

जान्हवीने 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ या रोमँटिक चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यासाठी तिला सर्वोत्तम महिला पदार्पणाचा ‘झी सिने पुरस्कार’ मिळाला होता. आता ती ‘रुही’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. यात जान्हवी दुहेरी भूमिका साकारत आहे, तर तिच्यासोबत या चित्रपटात राजकुमार रावही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ गाण्याच्या यशानंतर नवीन गाणे रिलीझ, अवघ्या ५ दिवसात १३ लाख हिट्स

-मोनालिसाही झाली ‘डोन्ट रश चॅलेंज’मध्ये सामील, डान्स मुव्हने लावले चाहत्यांना वेड

-आलिया भट्टचा ‘हा’ डायलॉग म्हणत चक्क रडली होती सारा अली खान, पाहा थ्रोबॅक व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.