मोनालिसाही झाली ‘डोन्ट रश चॅलेंज’मध्ये सामील, डान्स मुव्हने लावले चाहत्यांना वेड

monalisa dance video viral with dontrushchallenge


भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा आजकाल टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. आता देशभरातील प्रेक्षक तिचे चाहते आहेत. मोनालिसा आजकाल सोशल मीडियावर बऱ्यापैकी अ‍ॅक्टिव असते. तिच्या फोटोंद्वारे आणि व्हिडिओंद्वारे ती सोशल मीडियावर कायम नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते. आता पुन्हा मोनालिसाने एक नवीन डान्स व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना सरप्राईझ दिले आहे.

नुकत्याच समोर आलेल्या या नवीन व्हिडिओमध्ये, मोनालिसा तिचे जबरदस्त डान्स मुव्हज दाखवून चाहत्यांना वेड लावत आहे. या व्हिडिओद्वारे ती सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या #डोन्टरशचॅलेंज (#dontrushchalenlenge) या हॅशटॅग मध्ये सामील झाली. ‘डोन्ट रश चॅलेंज’ सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत असून यावर बनवले जाणारे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत, या चॅलेंजमध्ये मोनालिसाला सामील झालेली पाहून तिचे चाहते बरेच खुश झालेत.

या व्हिडिओमध्ये मोनालिसा व्यतिरिक्त कलाकार कुणाल वर्मा देखील दिसत आहे. मोनालिसाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका अनोख्या पद्धतीने थिरकताना दिसत आहे.

काय आहे ‘डोन्ट रश चॅलेंज?
या चॅलेंजमध्ये वापरण्यात येणाऱ्या गाण्याला ब्रिटिश रॅपर यंग टी आणि बगसी (Young T and Bugsey) यांनी मिळून गायले आहे. हे इंग्रजी गाणे हेडी वन (headie one) या ब्रिटिश रॅपरवर चित्रीत केले गेले आहे. गाणे 2019 मध्ये रिलीझ झाले होते. परंतु काही दिवसांपासून यांच्याशी संबधित चॅलेंज सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहेत. यापूर्वी टीव्ही अभिनेत्री निया शर्मा, फातिमा सना शेख आणि विक्की कौशल हेदेखील या चॅलेंजवर धमाल करताना दिसले.

मोनालिसाबद्दल बोलायचे झाले, तर तिचे खरे नाव अंतरा विश्वास आहे. भोजपुरी सिनेमातही तिने अनेक चित्रपट केले आहेत. मोनालिसाने ‘बबली और बंटी’, ‘तौबा तौबा’, ‘जलवा’ आणि ‘काफिला’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्टार प्लसवरील ‘नजर’ या मालिकेत मोनालिसाने जादुई चेटकीणीची भूमिका साकारली होती. मोनालिसा ‘बिग बॉस 10’ मध्येही दिसली होती. शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड विक्रांतसिंग राजपूत याच्याशी विवाह झाला होता. आता मोनालिसा सध्या नवीन टीव्ही शो ‘नमक इस्क का’ मध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लय भारी! जस्टिन बीबरच्या गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके, डान्स बघून चाहते घायाळ

-खेसारी लालचं ‘सवा लाख की साडी’ गाणं व्हायरल, एकाच आठवड्यात मिळाले ४९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-ये हुई ना बात! तृतीयपंथी पूजाला घरी बोलवून अंकिताने केला आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा, लावले जोरदार ठुमके


Leave A Reply

Your email address will not be published.