Tuesday, February 18, 2025
Home भोजपूरी गायिका रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ गाण्याच्या यशानंतर नवीन गाणे रिलीझ, अवघ्या ५ दिवसात १३ लाख हिट्स

गायिका रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ गाण्याच्या यशानंतर नवीन गाणे रिलीझ, अवघ्या ५ दिवसात १३ लाख हिट्स

हरियाणाची प्रसिद्ध गायिका रेणुका पंवार हिचे ’52 गज का दामन’ हे गाणे बरेच लोकप्रिय झाले. या गाण्याच्या यशानंतर तिचे नवीन गाणे चर्चेत आले आहे. रेणुकाच्या ‘तेरी खातर’ या नवीन गाण्याने हरियाणा संगीत उद्योगात धमाल केली आहे. रेणुकाचे प्रत्येक गाणे सोशल मीडियावर व्हायरल होते, यावरून तिच्या गाण्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज काढला जाऊ शकतो.

रेणुका पंवारच्या या हरियाणवी गाण्याला धनेश राजनेही आवाज दिला आहे. एमएसटी याने गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर धनेश राजनेच गाण्याला संगीत दिले आहे. ‘तेरी खातर’ गाणे 11 मार्च रोजी रिलीझ झाले होते. गाण्याला आतापर्यंत 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या म्युझिक व्हिडिओमध्ये रेणुका खूपच मनमोहक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. ‘तेरी खातर’ या गाण्याची लोकप्रियता पाहता असे दिसते की, हे गाणे ’52 गज का दामन’च्या यशाचा विक्रम नक्कीच मोडेल.

यापूर्वी आलेले रेणुकाचे ’52 गज का दामन ‘हे गाणेही जोरदार हिट झाले होते. हे गाणे रेणुकाने अतिशय सुंदर पद्धतीने गायले आहे. तसेच, गाण्यात अमन जाजी आणि प्रांजल दहिया दिसले होते. या गाण्याला संगीत एमजेने दिले असून बोल मुकेश जाजी यांनी दिले आहेत.

हरियाणा संगीत उद्योगातील गाणी त्यांच्या बोलीभाषेमुळे खूपच मधुर आणि जबरदस्त वाटतात. या गाण्यांची ख्याती अशी की, हरियाणाची जबरदस्त गायिका बनलेली रेणुका पंवार हिचे देश-विदेशात लाखो चाहते आहेत. यापूर्वी रेणुकाच्या ‘हरियाणवी बीट’ आणि ‘चटक मटक’ या गाण्यांनाही चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती. रेणुका पंवार व्यतिरिक्त हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीही ‘चटक मटक’ गाण्यात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लय भारी! जस्टिन बीबरच्या गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके, डान्स बघून चाहते घायाळ

-खेसारी लालचं ‘सवा लाख की साडी’ गाणं व्हायरल, एकाच आठवड्यात मिळाले ४९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-ये हुई ना बात! तृतीयपंथी पूजाला घरी बोलवून अंकिताने केला आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा, लावले जोरदार ठुमके

हे देखील वाचा