कादर खान हिंदी चित्रपटातील एक चांगले कॉमेडियन आणि खलनायक होते. यासोबतच त्यांनी संवाद लेखक म्हणून अनेक सुपरहिट चित्रपटे दिली आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या पदाच्या मागे कादर खान यांचा मोठा हात होता, पण कादर खान यांच्या कारकीर्दीच्या समाप्तीमागे अमिताभ यांचा मोठा हात होता. त्याच अमिताभला ‘अमित जी’ न म्हणल्यामुळे कादर खान यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.
सोशल मीडियावर अजूनही तो व्हिडिओ उपलब्ध आहे, ज्यामध्ये कादर खान यांना चित्रपट मिळणे कसे बंद झाले आणि अमिताभ बच्चन यांना ‘सर जी’ न म्हणल्यामुळे कशाप्रकारे त्यांना चित्रपटातून काढून टाकले गेले याबद्दल ते सांगत आहेत. या व्हिडिओमध्ये कादर खान म्हणत आहेत, “मी अमिताभ बच्चन यांना अमित म्हणून संबोधत असे. मग एक निर्माता माझ्याकडे आला आणि म्हणाला की. ‘तुम्ही सर जी ला भेटलात का?’ मी म्हणालो, कोण सर? यावर तो म्हणाला, ‘तुम्हाला सर जी माहित नाही?’ त्याने अमिताभकडे ईशारा केला आणि म्हणाला की, ‘ते आमचे सर आहेत.’ मी म्हणालो की, तो तर अमित आहे. तेव्हापासून सर्वजण त्यांना सर जी, सर जी बोलू लागले. परंतु, त्यांच्यासाठी माझ्या तोंडातून कधीच अमित जी किंवा सर जी बाहेर आले नाही. हेच बोलू न शकल्यामुळे मला त्यांच्या गटातून काढण्यात आले.”
कादर खान पुढे म्हणतात, “कोणी आपल्या मित्राला किंवा भावाला दुसर्या नावाने बोलवू शकतो का? हे अशक्य आहे. मी हे करू शकलो नाही आणि म्हणूनच त्यांच्याशी असलेले नाते पहिल्यासारखे राहिले नाही. म्हणूनच मी त्यांच्या ‘खुदा गवाह’ चित्रपटात राहिलो नाही. मग मी त्यांचा ‘गंगा जमुना सरस्वती’ हा चित्रपट अर्धा लिहून सोडला. यानंतर मी आणखी काही चित्रपट बनवायला घेतले. ज्यावर मी कामही करण्यास सुरुवात केली, पण काही वेळाने तेही सोडून दिले”.
आपल्या सुपरस्टारडम दरम्यान जसे राजेश खन्नाने सलीम जावेदला ‘हाथी मेरी साथी’ मध्ये ब्रेक दिला होता त्याचप्रमाणे राजेश खन्ना यांनी ‘रोटी’ या चित्रपटात कादर खानला संवाद लेखक म्हणून ब्रेक दिला होता. त्यानंतर कादर खानने राजेश खन्नाच्या बऱ्याच चित्रपटांसाठी संवाद लेखन केले. जीतेंद्रच्या ‘तोहफा’ या चित्रपटाच्या नंतर कादर खान यांनी जवळजवळ त्यांच्या सर्व चित्रपटांचे संवाद लिहिले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा