Friday, April 19, 2024

क्या बात है! तब्बल ४७ वर्षांपूर्वी कादर खान यांना डायलॉग लिहिण्यासाठी मिळायचे ‘इतके’ लाख रुपये

एखाद्या व्यक्तीमध्ये किती प्रतिभा असू शकते, हे समजून घ्यायचे असेल, तर दिग्गज अभिनेते कादर खान यांना जाणून घेतलं पाहिजे. उत्कृष्ट कलाकार, विनोदी कलाकार, चरित्र कलाकार, खलनायक, उत्कृष्ट पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि त्याहीपेक्षा एक उत्तम व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासोबत काम केलेले लोक आजही त्यांची प्रशंसा करतात. पडद्यावर त्यांनी कोणतीही भूमिका साकारली, तरी त्यांनी वेगळीच छाप सोडली. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या कादर खान यांनी आजच्याच दिवशी ३ वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर, २०१८ रोजी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलचा एक किस्सा जाणून घेऊया.

कादर खान यांनी हिट चित्रपटांचे लिहिले डायलॉग
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक ते कॉमेडियन अशा वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कादर (Kadar Khan) यांचा जन्म 22 ऑक्टोबर, 1937 रोजी काबुल, अफगाणिस्तान येथे झाला होता. कादर यांची लेखणी इतकी कमालीची होती की, त्यांच्या डायलॉगमुळे त्यांनी अनेक चित्रपट हिट केले होते. सुपरस्टार राजेश खन्ना असो किंवा अमिताभ बच्चन, अशा अनेक कलाकारांची कारकीर्द हिट करण्यात कादर खान यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या लेखणीशीच संबंधित एक मनोरंजक किस्सा जाणून घेऊया.

‘रोटी’साठी मिळाले 1 लाख 25हजार रुपये
मनमोहन देसाई यांचा 1974 मध्ये ‘रोटी’ चित्रपट आला होता. राजेश खन्ना आणि मुमताज यांचा हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे डायलॉग कादर खान यांनी लिहिले आहेत आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 47 वर्षांपूर्वी मनमोहन देसाई यांनी त्यांना या चित्रपटाचे डायलॉग लिहिण्यासाठी 1लाख 25 हजारांची रक्कम दिली होती.

या चित्रपटाबाबत कादर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते मनमोहन देसाई यांना भेटले तेव्हा ते म्हणाले होते की, “मला माहित आहे की, तुम्हा लोकांना लिहायला येत नाही, तुम्ही कविता लिहिता. मला कविता नकोत, टाळ्या वाजवणारे डायलॉग हवे आहेत. जर कचरा लिहून आणला, तर तो फाडून नाल्यात फेकून देईन.”

मनमोहन देसाई डायलॉग ऐकून झाले होते खुश
कादर खान म्हणाले होते की, “चांगले लिहिले तर मनमोहन देसाई म्हणाले की, डोक्यावर बसवून नाचेल.” यानंतर त्यांना ‘रोटी’चा क्लायमॅक्स लिहिण्याचे काम देण्यात आले. कादर यांनी रात्रभर बसून ते लिहिले, दुसऱ्या दिवशी भेटायला गेले आणि जेव्हा त्यांनी डायलॉग कथन केले, तेव्हा मनमोहन देसाई इतके खुश झाले की, त्यांनी घातलेले सोन्याचे ब्रेसलेट काढले. एवढेच नाही, तर 25 हजारांची रोकड आणि टीव्ही सेटही दिला. मग लिहायला किती पैसे लागतात विचारले.

यानंतर कादर खान जरा दचकून म्हणाले, “25हजार.” त्यावर ते म्हणाले, “मी तुला एक लाख देतो, असेच मस्त डायलॉग लिही.” कादर यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले होते आणि जवळपास 250चित्रपटांचे डायलॉग लिहिले होते.

कादर खान सुपरन्यूक्लियर पाल्सी सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. 28 डिसेंबर, 2018 रोजी त्यांना कॅनडाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे ते उपचारासाठी आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होते. 31 डिसेंबर, 2018 रोजी त्यांचा मुलगा सरफराज खानने वडिलांच्या निधनाची माहिती दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :
आयुष्यात पहिल्यांदाच १५०० रुपये पाहून कादर खान यांचे थरथर कापत होते हात-पाय; डोळ्यांवर नव्हता बसत विश्वास
जेव्हा दिलीप कुमारांच्या डोळ्यात आले होते कादर खान यांच्यामुळे अश्रू, अभिनेत्याला मानावी लागली होती ‘ही’ अट

हे देखील वाचा