Saturday, July 6, 2024

कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा जोराचा ‘झटका!’ ‘या’ चित्रपटातूनही त्याला थेट ठोकण्यात आला ‘राम राम’

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची वेळ सध्या वाईट चालली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एकामागून एक चित्रपट अभिनेत्याच्या हातातून जात आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननंतर कार्तिक आर्यनने, शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट सोडले आणि ‘फ्रेडी’ चित्रपटासाठीची साइनिंग अमाउंटही परत केली. मात्र आता बातमी येत आहे की, कार्तिकच्या हातातून आणखी एक चित्रपट गेला आहे. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी याबाबत त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, कार्तिक आर्यनच्या हातातून आणखी एक चित्रपट गेला आहे. कार्तिक आर्यनला चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटातून वगळण्यात आले आहे. हा एक गँगस्टर चित्रपट आहे, पण आता कार्तिक या चित्रपटाचा भाग नसणार आहे. वृत्तानुसार, आनंदसोबत कार्तिकचे बोलणे एका वेगळ्या स्तरावर पोहचले होते.

तसेच, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर, चित्रपट प्रवक्त्याने यासंबंधी निवेदन जारी करत त्याला अफवा म्हटले आहे. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या सर्व निराधार गोष्टी आहेत. आम्ही कार्तिकला भेटलो आहोत आणि तो एक वेगळा चित्रपट आहे त्याबद्दल गोष्टी बोलल्या जात आहेत. तर आयुष्मानसोबत आमचा दुसरा चित्रपट आहे आणि या दोन गोष्टी पूर्णपणे एकत्र करून बोलल्या जात आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच, कार्तिक आर्यन करण जोहर निर्मित ‘दोस्ताना २’ मधून बाहेर पडल्यामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने जान्हवी कपूर सोबत चित्रपटाची शूटिंग मोठ्या प्रमाणात पूर्ण केली होती, परंतु एका सर्जनशील मुद्दयामुळे त्याने कॉलिन डीकुन्हा दिग्दर्शित या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटात राजकुमार राव कार्तिकची जागा घेण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात आहे. सध्या कार्तिककडे कियारा अडवाणी सोबत अनीस बज्मीचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया २’ आहे. या व्यतिरिक्त त्याने सध्या रोहित धवनच्या चित्रपटासाठी देखील साईन अप केले आहे, जो सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये आहे. रॉनी स्क्रूवाला निर्मित कार्तिक अभिनित ‘धमाका’ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

-बॉलिवूड हे स्वप्नही नसलेला युवक ते डॅशिंग सुपरस्टार, पाहा मुळ नावासह जॉनचा जीवनप्रवास

हे देखील वाचा