Tuesday, March 19, 2024

बॉलिवूड हे स्वप्नही नसलेला युवक ते डॅशिंग सुपरस्टार, पाहा मुळ नावासह जॉनचा जीवनप्रवास

बॉलिवूडचा असा मर्द गडी जो सलमान, शाहरुख यांच्याप्रमाणे फक्त नावावर चित्रपट गृहात गर्दी खेचून आणतो. गेली १७ वर्ष तो इंडस्ट्रीमध्ये काम यशस्वीरित्या करतोय. बॉलीवूडममधल्या बड्या बड्या नावांच्या यादीत त्याने स्वतःच नाव नेण्यात यश मिळवलं. आज त्याच जॉन अब्राहमच्या बॉलिवूड कारकीर्दीवर आणि वैयक्तिक आयुष्याचा एक आढावा घेऊयात.

सन १९७२ चा मुंबईतील जन्म असलेला जॉन आजच्या घडीला एक यशस्वी अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखला जातो. परंतु या जॉनच मूळ नाव हे जॉन नाहीच आहे. त्याच मूळ नाव हे फरहान आहे.

त्याचं झालं असं, जॉनची आई ही होती पारशी आणि बाबा होते मल्याळी! या दोघांना जॉन झाल्यानंतर त्याच्या आईने त्याच नाव हे फरहान ठेवलं. सिनेमांमध्ये येईपर्यंत त्याचं नाव हे फरहानच होतं. परंतु सिनेमात येण्यासाठी त्याने आपल्या वडिलांचं नाव जॉन लावलं आणि आपण आज त्याला जॉन अब्राहम म्हणून ओळखतो.

जॉन जसजसा मोठा होऊ लागला त्याचा कल हा मॉडलिंगकडे जास्त वाढू लागला. त्याने तशी सुरुवात देखील केली. परंतु आर्थिक बाबी पूर्ण करण्यासाठी त्याने काही काळ मीडिया प्लॅनर म्हणून नोकरी केली. त्यानंतर जॉन हा पूर्ण वेळ मॉडलिंगसाठी देऊ लागला.

त्याला त्याचा पहिला सिनेमा मिळेपर्यंत तो भारतातील टॉपचा मॉडेल होता. अशात त्याला २००३ साली रिलीज झालेल्या महेश भट दिग्दर्शित जिस्म या सिनेमाची ऑफर आली. आणि जॉनने बॉलिवूडमध्ये या सिनेमापासून पदार्पण केलं.

जॉन चे सुरुवातीचे काही सिनेमे हे सतत फ्लॉप गेले. त्याच्या पदर्पणाच्याच वर्षी त्याचे ३ सिनेमे प्रदर्शित झाले आणि तिन्ही फ्लॉप ठरले. परंतु जॉन ला खरी ओळख मिळाली ती २००४ साली आलेल्या यश राज फिल्म्स च्या धूम या सिनेमातून!

अभिषेक बच्चन स्टारर या सिनेमात जॉन ने एका हायटेक चोराची भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यावेळच्या तरुणांमध्ये जॉन हा युथ आयकॉन बनला होता. यानंतर जॉन ने पुन्हा मागे वळून कधी पाहिलंच नाही.

पुढेदेखील त्याचे काही सिनेमे सुपर डुप्पर हिट झाले तर काही बॉक्स ऑफिस वर चांगलेच आपटले मात्र त्याची बॉलीवूडमधली घौडदौड ही आजतागायत सुरूच राहिली.

आपल्याला ठाऊक आहे का की जॉनच्या एका सिनेमाला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं होतं. त्याच्या करियरच्या सुरुवातीच्याच काळात त्याच्या वाट्याला एक असा सिनेमा होता ज्याने त्याला ऑस्करपर्यंत नेलं. स्वतंत्र कॅनेडियन सिने निर्मात्या दिपा मेहता लिखित आणि दिग्दर्शित वॉटर या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

या सिनेमाची कथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील विधवा स्त्रियांच्या प्रश्नांवर भाष्य करते. हा सिनेमा त्यावेळी जगभर गाजला. इतका की २००६ च्या ७९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फॉरेन सिनेमा म्हणून नॉमीनेश मिळालं. या पुरस्कारासाठी जॉन आणि सिनेमाच्या संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. दुर्दैवाने, जर्मनीच्या द लिव्हज ऑफ अदर्स या सिनेमाकडून वॉटर ला मात खावी लागली.

जिस्म या सिनेमापासून बिपाशा आणि जॉन हे एकत्र आले ते पुढील अनेक वर्षे एकत्रच होते. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये हे कपल इतकी वर्षे राहिल्यानंतर २०११मध्ये दोघांनीही ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बिपाशाने करणं ग्रोव्हर सोबत लग्न केलं तर जॉन ने २०१४ मध्ये प्रिया रूंचाल हिच्याशी लग्न केलं. आता दोघेही आनंदाने राहत आहेत.

जॉन हा एक फिटनेस मॉडेल देखील आहे. धूम्रपान, मद्यपान यापैकी कोणतंच व्यसन त्याला नाही. तो नेहमीच अशा पार्टीजला जाणं टाळत असतो.

सोबतच जॉन ला बाईक्सचं कलेक्शन करायला देखील खूप आवडतं. तो प्रचंड बाईकवेडा आहे. लाखोंच्या किमतीच्या सुपरबाईक्सचं कलेक्शन जॉन ने करून ठेवलं आहे. आजच्या घडीला जॉनच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू, होंडा सीबीआर, अप्रिलिया, यामाहा, एम व्ही अगस्ता अनाजी डुकाटी सारख्या कंपनीजच्या सुपरबाइक्सचं कलेक्शन आहे.

जॉन ने विकी डोनर या सिनेमापासून निर्मिती क्षेत्रात हात आजमावला. विकी डोनर आयुष्यमान खुराना स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल चालला. यानंतर जॉन ने आणखी एका सिनेमाची निर्मिती केली तो म्हणजे मद्रास कॅफे! या सिनेमात स्वतः जॉन ने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.

याशिवाय जॉन दोस्ताना, देसी बॉईज, शूट आउट एट वडाळा, परमाणु, सत्यमेव जयते, ढिशुम,फोर्स, फोर्स२ अशा काही सिनेमांमधून दिसला आहेच. पुढच्या वर्षी त्याचे सत्यमेव जयते२, मुंबई सागा हे सिनेमे आपल्या भेटीला येणार आहेत. आपण सुद्धा त्याचे हे सिनेमे पाहण्यासाठी उत्सुक असालच ना!

हे देखील वाचा