Thursday, March 30, 2023

KK struggle | केके सुरुवातीला करत होते हॉटेलमध्ये काम, हरिहरन यांच्या सांगण्यावरून गाठली मुंबई, वाचा तो किस्सा

गायक केके (krushnakumar kunnath) यांचे मंगळवारी ( ३१ मे) रोजी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते कोलकाता येथील एका कॉलेज फेस्टमध्ये परफॉर्म करत होते तेव्हा ते खाली पडले आणि त्यांना कोलकाता येथील सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, त्याच्या पहिल्या अल्बम ‘पल’ने लोकप्रियता मिळवली. ज्यामध्ये ‘पल’, ‘यारों’ सारखी गाणी होती. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप के’ या गाण्याने केकेच्या करिअरमध्ये एक मोठे वळण आले. केके आपल्या यशाचे श्रेय त्याची पत्नी ज्योतीला देतात. एका मुलाखतीत त्यांनी गायक हरिहरन यांना मुंबईत येण्याचे कारण सांगितले.

केकेने सोनी म्युझिक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, संगीत उद्योगात काम करण्यासाठी १९९४ मध्ये मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीत काम केले होते. केकेने शेअर केले की त्याची पत्नी ज्योतीने त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्याला खूप पाठिंबा दिला. आपल्या यशाचे श्रेय तो आपल्या पत्नीलाच देत असे.

केकेने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ते एकदा दिल्लीत कुठेतरी गात होते, जिथे गायक हरिहरनने त्याची दखल घेतली. हरिहरन यांनी त्यांच्या गायनाचे कौतुक केले आणि त्यांना (केके) मुंबईला जाण्यासाठी प्रोत्साहित केले. काही काळानंतर केके मुंबईला आले.

केकेचे हिंदी चित्रपटातील पहिले गाणे ‘छोड आये हम वो गल्लियाँ’ हे ‘माचीस’मधील होते. विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या गाण्यात हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल हे सहगायक होते. विशाल भारद्वाज यांनी हे गाणे लिहिले आहे. हे गाणे सुपरहिट झाले आणि आजही खूप ऐकले जाते.

केके यांनी देशातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली. केकेने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगु, मराठी, कन्नड, बंगाली, मल्याळम, गुजराती आणि आसामी भाषेत अनेक गाणी गायली आहेत. प्रत्येक भाषेत त्यांचे चाहते आहेत, जे आज त्यांची आठवण काढत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा