Thursday, September 28, 2023

भांडं फुटलं रे! तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्राने गुपचूप केलं लग्न? ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र माजली खळबळ

तेजस्वी प्रकाश ही ‘बिग बॉस 15‘ विजेती राहिली आहे. तसेच, ती ‘नागिन‘ मालिकेत मुख्य भूमिका बजावते. याव्यतिरिक्त तेजस्वी प्रकाश तिच्या लव्हलाईफमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारी तेजस्वी ही पॅपराजींचीही आवडती बनली आहे. तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा हादेखील अभिनेत्रीप्रमाणेच वेगवेगळ्या कारणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. दोघांचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. अशात पुन्हा एकदा दोघांशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी दोघांनी लग्न केल्याचे अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.

का होतेय लग्नाची चर्चा?
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Karan Kundrra And Tejasswi Prakash) यांच्या नावाचा समावेश होतो. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) यांनी नुकतीच इस्त्रायली काऊंसिल जनरल कोब्बी शोशानीची भेट घेतली. या भेटीनंतर कोब्बी यांनी दोघांसोबतचे फोटो शेअर केले. कोब्बी यांनी ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये असे काही लिहिले की, ज्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. प्रत्येकाचे लक्ष फक्त यावर आहे की, आता लोक ही पोस्ट पाहिल्यानंतर प्रश्न करत आहेत की, तेजस्वी आणि करणने गुपचूप लग्न केले आहे का?

या पोस्टने माजवली खळबळ
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Tejasswi Prakash And Karan Kundrra) यांच्यासोबतचा फोटो शेअर करत कोब्बी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “करण कुंद्रा प्रिय अभिनेता असल्यासोबच एक सज्जन व्यक्तीही आहे. त्याची पत्नी तेजस्वी प्रकाशला भेटून खूप आनंद झाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kobbi Shoshani (@kobbi.shoshani)

कोब्बी यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये तेजस्वीला करणची पत्नी म्हटल्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे जात आहे. या पोस्टवर करण कुंद्रानेही कमेंट केली आहे. त्याने कमेंट करत लिहिले की, “आम्हाला तुमच्या घरी आमंत्रित केल्यामुळे आणि आम्हाला कुटुंबासारखे वागवल्याबद्दल धन्यवाद.”

Karan-Kundrra-Comment
Photo Courtesy: Instagram/kobbi.shoshani

आता कोब्बी यांनी तेजस्वीला करणची पत्नी का म्हटले, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण खूपच उत्सुक झाले आहेत. (did actress tejasswi prakash and karan kundrra secretly get married viral post creates stir)

महत्त्वाच्या बातम्या-
चांद्रयान-3 मिशनबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने अभिनेते अडचणीत, हिंदू संघटनांनी पोलिसात तक्रार केली दाखल
एकत्र दिसल्या आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी; नेटकरीही म्हणाले, ‘आमिरशी घटस्फोट घेतल्यानंतर दोघी…’

हे देखील वाचा