बॉलिवूड जगात काही चित्रपट असे होऊन गेले की, त्यांची नावे अजूनही घेतली जातात. त्यातलाच एक एव्हरग्रीन चित्रपट म्हणजे ‘शोले.’ हा चित्रपट तयार होताना प्रत्येक पात्र निवडताना एक वेगळीच मज्जा होती. शोले चित्रपट स्क्रीनवर दिसण्याइतकाच मजेदार तयार झाला आहे. शोले चित्रपट होण्यापूर्वीच त्यांमध्ये कलाकार निवडण्याच्या कारणांमुळे तो बराच चर्चेत राहिला होता. ‘शोले’ चित्रपटाची पटकथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. या चित्रपटाची गंमत म्हणजे पटकथा लिहिताना कोण कोणते पात्र साकारणार होते हे त्यावेळी ठरलेले नव्हते.
स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी प्रथम संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांना कास्ट केले होते. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर या दोन्ही कलाकारांना गब्बरचे पात्र जास्त आवडले होते. या दोन्ही कलाकारांनी गब्बरची भूमिका साकारण्याची इच्छा दर्शविली होती. म्हणून त्यावेळी चित्रपटासाठी गब्बरची निवड झाली नव्हती.
रमेश शिप्पी यांनी संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही हे स्पष्ट केले की, चित्रपटाचा गब्बर त्यांच्या दृष्टीने इतर कोणी आहे. डॅनी त्यावेळी अव्वल खलनायक म्हणून परिचित होते. गब्बरची ही भूमिका त्यांना ऑफर करण्यात आली होती. थोड्या काळानंतर डॅनी यांनी तारखांच्या समस्येचे कारण सांगून, ही भूमिका करण्यास नकार दिला होता.
‘शोले’ चित्रपटासाठी गब्बरचा शोध पुन्हा एकदा सुरू झाला. कोणीतरी रमेश सिप्पी यांना अमजद खान यांचे नाव सुचवले. त्यावेळी अमजद हे चित्रपटांमध्ये सक्रिय झाले नव्हते. अमजद यांनी ही भूमिका स्वीकारली. अशाप्रकारे, अमजद गब्बरसाठी निवडले गेले होते, हे कायमचे लक्षात राहण्यासारखे पात्र आहे.
बसंती निवडण्यात कोणतीही विशेष समस्या आली नव्हती. हेमा मालिनी यांना या भूमिकेसाठी घेणार असल्याचे रमेश सिप्पी यांनी आधीच मनापासून ठरवले होते. हेमा यांनीही यास मान्य केले, तर अमिताभ यांना जय नावाचे पात्र दिले गेले. आता वीरू पात्रासाठी शोध घेणे सुरू होते. या भूमिकेसाठी धर्मेंद्र यांच्याशी बोलण्यात आले. पटकथा ऐकल्यानंतर धर्मेंद्र यांनी वीरूऐवजी ठाकूरची भूमिका पसंत केली. ठाकूर यांच्या भूमिकेसाठी संजीव कुमार अंतिम ठरले होते. धर्मेंद्र ठाम होते की, त्यांना ठाकूरची भूमिका साकारायची आहे.
रमेश सिप्पी म्हणाले की, जर तुम्हाला ठाकूरची भूमिका दिली गेली, तर वीरूची भूमिका संजीव कुमार करतील. हा नवीन प्रस्ताव ऐकल्यावर धर्मेंद्र यांनी शांतपणे वीरूची भूमिका साकारण्यास मान्य केले. धर्मेंद्र यांना निश्चित करताच चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. यातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम करत या चित्रपटाला अशा एका प्रगतीच्या उंचीवर नेऊन ठेवले की, प्रेक्षक आजही ‘शोले’ चित्रपटाचे चाहते आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तर ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’, रंजक आहे एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी
कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी भरत जाधवने लढवली अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’