Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

चित्रपट अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते व्यायाम करताना दिसले आहेत. ते कुस्तीच्या पद्धतीमध्ये व्यायाम करत आहेत. त्यांनी या व्हिडिओसोबत एक फोटोही शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मिलिंद दोन्ही हातांनी व्यायाम करत आहेत. सोबतच ते फोटोमध्ये हसतानाही दिसत आहे. खरं तर, मार्चमध्ये मिलिंद सोमण यांची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन केले होते. तथापि, ते आता ठीक आहेत आणि प्लाझ्मा देण्याची तयारी करत आहेत. व्हिडिओमधील व्यायाम हा प्लाझ्मा दान देण्यासाठीचीच तयारी आहे.

यासह त्यांनी संदेशही दिला आहे की, सर्वांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे. व्हिडिओ शेअर करत मिलिंद सोमण यांनी लिहिले, “मला वाटत आहे की, मी पूर्णपणे बरा झालो आहे. मी पुढील १० दिवसांत प्लाझ्मा दान करण्यास सक्षम होईल. कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या लोकांच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर, इतर लोकांना बरे करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. विश्रांती घ्या. तुम्ही जे करू शकता ते करा. काळजी घ्या.”

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत बॉलिवूडचे अनेक कलाकार पुढे येऊन मदत करत आहेत. नुकतेच लता मंगेशकर यांनी महाराष्ट्र सीएम केअर फंडमध्ये, कोरोनाशी लढण्यासाठी ७ लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याचबरोबर, अभिनेता वरुण धवनने मित्रांसह, रूग्णालयांना उपचारासाठी ३९०० ऑक्सिजन कंसंट्रेटर भारतात आणले आहेत.

त्याचवेळी ट्विंकल खन्नाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने, २५० ऑक्सिजन कंसंट्रेटर मागवले आहेत. विशेष म्हणजे कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा भारतात खूप वेगाने प्रसार झाला आहे. यामुळे सर्व कलाकार आपल्या चाहत्यांना घरी राहण्याचे, तसेच मास्क घालण्याचेही आवाहन करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का अन् विराटच्या लग्नात चिक्कार पैसा केला होता खर्च, इटलीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यात आले होते ‘इतके’ कोटी बिल

-दिग्गज अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल, पत्नी सायरा बानो यांनी दिले त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

हे देखील वाचा