Friday, May 24, 2024

जुळ्या मुलांची नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार शाहरूखची फॅन; अभिनेता म्हणाला,’ प्लिज त्यांना आणखी..’

बॉलिवूडवर खऱ्या अर्थाने कुणी राज्य करत असेल तर ते नाव म्हणजे शाहरुख खान होय. किंग खान, बादशाह इत्यादी नावाने मिरवणाऱ्या शाहरुखचे लाखो चाहते आहेत. देशातच नव्हे तर परदेशातही शाहरूख खानचे चाहते आहे. विशेष म्हणजे शाहरुखने बॉलिवूडमधील त्याचं आत्ताच हे स्थान स्वकष्टाने मिळवलं आहे. आज शाहरुखची कारकीर्द जवळपास तीस वर्षांहून एधिक काळ उलटून गेला आहे. या 31 वर्षांमध्ये शाहरुखने शंभरीच्या आसपास हिट सिनेमे केले असतील.

अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) लोकप्रियता आणि त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग याचे अनेक रंजक किस्से आजपर्यंत तुम्ही अनेक ऐकले असतील. शाहरुख खानचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठीस नेहमीच उत्सुक असतात. मात्र, एका महिला फॅनने कहरच केला आहे. बॉलीवूडमधील आपल्या अभिनय कारकिर्दीला 31 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहरुख खानने ट्विटरवर एसआरके सेशन आयोजित केले. त्यावेळी त्याच्या चाहत्यांना त्याला अनेक प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे शाहरूख खानने दिली आहेत.

शाहरुख खानच्या फॅन फॉलोइंगची एक मोठी यादी आहे. एसआरके सत्रादरम्यान एक महिला फॅनने शाहरूखला तिचे अभिनंदन करण्यास सांगीतले. ती म्हणाली की, “मी प्रेग्नंट आहे. मी जुळ्या मुलांची आई होणार आहे आणि मी माझ्या जुळ्यामुलांचे नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार होणार आहे.” हे प्रकरण सध्या चांगलेत चर्चेत आले आहे.

यावर उत्तर देताना शाहरूख खान म्हणाला की, “खूप खूप अभिनंदन, पण प्लिज त्यांना आणखी चांगली नाव द्या.” यादरम्यान शाहरूख खान अस का म्हणाला यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Actor shahrukh khan asksrk session fan asked to congratulate her for twins name will be pathan jawan)

अधिक वाचा- 
सावत्र आई श्रीदेवींसोबत असे होते नाते, तर सलमानला मानतो आदर्श; जाणून घ्या अर्जुन कपूरबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी
झीनत अमान यांनी कठीण दिवसांबद्दल केला खुलासा; म्हणाल्या,’माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा माझ्या फिगरमध्ये लाेकांना…’

हे देखील वाचा