Friday, June 14, 2024

बिग बॉस फेम गौरी नागोरीवर केला तिच्याच बहिणीच्या नवऱ्याने हमला, व्हिडिओ शेअर करत मागितली सरकारकडे मदत

राजस्थानची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम गोरी नागोरीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोरी नागोरी राजस्थान सरकारकडे मदत मागताना दिसत आहे. गोरीने आरोप केला आहे की, तिच्या टीमवर हमला करून बाउन्सर आणि मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे. या हमल्यात तिच्यासोबत देखील मारपीट झाल्याचे ती सांगत आहे. ही घटना अजमेर गेगल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात २२ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.

गोरी नागोरीने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, २२ मेला तिच्या बहिणीचे लग्न होते. तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने जावेद हुसेनने सांगितले की, तुम्ही लग्न किशनगढ येथे करा, मी सर्व तयारी करून देईल. त्यांच्या सांगण्यावरून हे लग्न किशनगढ येथे करण्यात आले. नागोरी म्हणाली, मला नाही माहित ही एक चाल होती. लग्नानंतर जेव्हा पाठवणी होत होती, तेव्हा तिच्या जिजाने त्याच्या काही नातेवाईकांसोबत तिच्यावर हमला केला.

गोरी नागोरीने सांगितले की हा हमला झाल्यानंतर जेव्हा मध्ये तिचा स्टाफ आला तेव्हा त्यांना देखील मारहाण करण्यात आली. माझे केस ओढण्यात आले, माझ्या स्टाफचे डोके फोडले गेले. व्हिडिओमध्ये गोरीने जावेद हुसैन, मुबारक हुसैन,वसीम, इस्लाम, नासिर,साजिद, शब्बीर मामा, साबिर, फतेह खान, आरिफ, इमरान, अरशद आणि इमरानसोबत अनेक लोकांची नावे घेतली आहेत. सोबतच तिने पोलिसांनी अजून काहीच कारवाई केली नसल्यचा देखील आरोप केला आहे.

हे देखील वाचा