Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

27 वर्षींनी लहान असलेल्या अभिनेत्रीसाेबत नवाजुद्दीनने केले लीप-लॉक किसिंग; नेटकऱ्यांचा संताप अनावर

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘टिकू वेड्स शेरू‘ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून टीव्ही स्टार अवनीत कौरही मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या अनोख्या प्रेमकथेची निर्मिती कंगना राणौतने केली असून दिग्दर्शन साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे. अशात आता बुधवारी (14 जुन)ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या एका दृश्यामुळे वादात सापडला आहे. खरं तर, या चित्रपटात 49 वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या अवनीत कौरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. इकतेच नव्हे तर, ट्रेलरमध्ये दोघांचे किसिंग सीन देखील दाखविण्यात आले आहे, ज्यामुळे युजर्स चांगलेच हैराण झाले आहेत.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) आणि अवनीत कौर (avneet kaur) यांची अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. यासाेबतच दोघांमध्ये रोमँटिक सीन्सही दाखवण्यात आले होते. मात्र, नवाजुद्दीनपेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या अवनीत कौरला लिप लॉक करताना पाहून युजर्स चांगलेच संतापले आहेत.

अशात सोशल मीडियावर काही लोक नवाजला त्याच्या वयाची आठवण करून देत आहेत, तर काही जण त्याची खिल्ली उडवत आहे. नवाजुद्दीनच्या अधिकृत इन्स्टा पेजवर शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘हे खूप चुकीचे आहे. हे काय आहे. जास्त वयाच्या पुरुष अभिनेत्यांसोबत तरुण अभिनेत्रींना कास्ट केले जात आहे.’ त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘शिट.. ही मुलगी तिच्या वडिलांच्या वयाच्या अभिनेत्यासोबत काय करत आहे.’

मंडळी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा हा मोस्ट अवेटेड चित्रपट 23 जूनला अॅमेझाॅन प्राईमवर रिलीज होणार आहे.(Bollywood movie tiku weds sheru trailer nawazuddin siddiqui kissing scene with 27 year younger avneet kaur sparks controversy)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
मराठमोळ्या उर्मिलाच्या हाॅटनेसचा कहर; पहा फोटो

हे देखील वाचा