Wednesday, June 26, 2024

प्रेमासाठी वाट्टेल ते! ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील आगळ्यावेगळ्या प्रेमकथा असलेले चित्रपट

हिंदी चित्रपट आणि प्रेमप्रकरणाच्या कथा हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले समीकरण आहे. आपल्या प्रेमिकेला आकर्षित करण्यासाठी चित्रपटाचे नायक काय काय प्रयोग करतात यावर डझनभर चित्रपट आत्तापर्यंत आले असतील. यामधले काही चित्रपट आणि अभिनेते गाजले तर काहींच्या या प्रेमकथेला प्रेक्षकांनी केराची टोपी दाखवली. पण यामध्ये हिंदी चित्रपट जगतातील काही नायकांचे हे प्रेमकथेवरील चित्रपट प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला इतकी प्रसिद्धी मिळाली की त्यांच्या सारखेच दिलजले होण्याचे स्वप्न भारतातील तरुण पाहू लागले. मात्र या चित्रपटांमध्ये ज्या प्रकारे अभिनेत्रीला धोका देऊन किंवा खोटे सांगुन प्रेम मिळवण्याची कथा रंगवली गेली ज्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड राग व्यक्त केला.  कोणते आहेत हे गाजलेले चित्रपट ज्यांमध्ये प्रेमात वेडे झालेले आशिक पाहायला मिळाले चला जाणून घेऊ. 

तेरे नाम

अभिनेता सलमान खानला राधे म्हणून ज्या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली तो चित्रपट म्हणजे तेरे नाम. या चित्रपटाची कथा आणि सलमान खानने साकारलेला जबरदस्त अभिनयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यामुळेच भारतीय तरुणाईला चित्रपटातील सलमान खानच्या तेरे नाम हेअर स्टाइलचे वेड लागले.मात्र सलमान खानला चित्रपटात ज्या प्रमाणे आपल्या अभिनेत्रीची किंमत नव्हती यामुळेच प्रेक्षकांना हे चित्रण चुकीचे वाटले.

कबीर सिंग

या चित्रपटात कबीर सिंग आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची दाखवण्याची तयारी दर्शवतो. मात्र ज्या प्रकारे त्याची चित्रपटात प्रितीसोबतची दाखवण्यात आली आहे. ते पाहून प्रेक्षकांनी नाराजी दाखवण्यात आली होती.कबीरने आपल्या मैत्रिणीला ज्या पद्धतीने वागवले ते सर्वच प्रेक्षकांच्या पचनी पडले नाही. कबीरने प्रीतीला थप्पड मारणे आणि रोखणे, अनेक प्रेक्षकांना ते आवडले नाही.

रांझणा :

चित्रपटात कुंदन (धनुष) चे प्रेम दाखवण्यात आले आहे, जो झोया (सोनम कपूर) शोधण्यासाठी त्याच्या मागे जातो. झोया कुंदनला पाठीमागे मारल्याबद्दल थप्पडही मारते, पण तो तिला त्याच्या कृत्यांपासून परावृत्त करत नाही आणि तिचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो.

Dhanush
Photo Courtesy: Instagram/dhanushkraja

‘रेहना है तेरे दिल में : आर माधवन या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मॅडी कशी फसवणूक करून नायिकेचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतो हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मुलीचे प्रेम मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार दिसतो.

‘बद्रीनाथ की दुल्हनिया‘:

वैदेहीचे प्रेम मिळवण्यासाठी बद्री कोणत्या प्रकारची नाटके करतो, खोटे बोलतो हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

गाढ झोपेत असताना गायक विक्टोरिया बेकहमच्या घरावर चोरटयांनी टाकला डाका, मौल्यवान वस्तूंची चोरी

‘या’ गोष्टीमुळे शाहिद कपूरला अनावर झाला राग, पाहून आजूबाजूच्या लोक लागले घाबरू, पाहा व्हिडिओ

‘त्याने माझे आयुष्य नरक बनवून टाकले होते’, श्वेता तिवारीने केला तिच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा