अभिनेत्री दिया मिर्झाने दुसऱ्यांदा बांधली लगीन गाठ, पाहा नवविवाहित जोडप्याचे खास फोटो


अभिनेत्री दीया मिर्झा सोमवारी (15 फेब्रुवारी) उद्योजक वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकली. या नवविवाहित जोडप्याचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. ‘रेहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या दीयाचे वयाच्या ३९व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केले आहे.

Photo Courtesy: Instagram/ diamirzaofficial/

दीया मिर्झाचा पती वैभव रेखी मुंबईच्या पाली हिल भागात राहतात. तसेच, दीया मिर्झा ज्या इमारतीत राहते, त्याच इमारतीच्या आतमध्ये एक मोठे गार्डन आहे, तिथे त्यांचे लग्न झाले. अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकरांनी या लग्नाला उपस्थिती लावली.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दीया मिर्झा वधूच्या वेशात अतिशय सुंदर दिसत आहे. तिने पारंपारिक पद्धतीने लाल साडी परिधान करून माथ्यावर लाल रंगाची चुनरी घेतली आहे.

अभिनेत्री दीया मिर्झाने लग्नाआधी बिझनेस मॅन वैभव रेखीबरोबर तिच्या मेहंदी सोहळ्याची आणि ब्राइडल शॉवरचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली होती. दीयाचे हे फोटोही बरेच व्हायरल झाले होते.

दीयाचा पती वैभव एक उद्योजक आहे आणि तो आर्थिक गुंतवणुकीची कामेही करतो. लग्नानंतर लगेचच दीया आणि वैभवने मीडियाला भेट दिली आणि सर्वांना मिठाई वाटली.

यापुर्वी दीयाने २०१४मध्ये निर्माता साहिल संघाशी लग्न केले होते, परंतू ते लग्न फार काळ टिकले नाही व त्यांनी २०१९मध्ये घटस्फोट घेतला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

शुभमंगल सावधान! ही मराठमोळी जोडी अडकली विवाहबंधनात, रजिस्टर पद्धतीने केले लग्न

आली समीप लग्न घटिका!  स्वप्नालीच्या हातावर रचली  आस्ताद च्या नावाची मेहंदी, कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

खरंय भाऊ, प्रेमाला नसतंय वयाचं बंधन.! या अभिनेत्रींनी केलं कमी वयाच्या नायकांसोबत लग्न एका जोडीत तर १२ वर्षांचं अंतर

 

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.