Friday, July 5, 2024

‘तेरा सूट’ गाण्यावर थिरकताना दिसलं नेहा कक्करचं आख्खं कुटुंब; गायिकेच्या घरी सुरू झाली होळीची धमाल

चित्रपटसृष्टीतील तारकांच्या घरी होळीची धमाल सुरू झाली आहे. यावर्षी असे अनेक कलाकार आहेत, जे लग्नानंतर प्रथमच होळी साजरी करतील. यांपैकी एक आहे बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर. पती रोहनप्रीत सिंगसोबत लग्नानंतर नेहा तिची पहिली होळी साजरी करणार आहे आणि तिच्या घरात आतापासूनच पार्टीचे वातावरण बनले आहे.

नेहाने तिच्या कुटुंबियांसह पार्टी सुरू केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहा तिचा भाऊ टोनी कक्कर, पती रोहनप्रीत सिंग आणि काही मित्रांसह पूलमध्ये मस्ती करताना दिसली आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये टोनी कक्करचे नुकतेच रिलीज झालेले गाणे ‘तेरा सूट’ वाजत आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, रोहनने नेहाला उचलून घेतले आहे. तो संपूर्ण व्हिडिओमध्ये नेहाला उचलून घेऊन मजा करताना दिसला. व्हिडिओ शेअर करत नेहाने होळीशी संबंधित कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले, ”मारू पिचकारी होके लेफ्ट, होके राईट !!! कुटुंबासोबत घरातील होळीच्या अगोदरची मजा.” नेहाचा हा मजेदार व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेहा सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. नेहा सतत इंस्टाग्रामवर तिचे आणि तिच्या कुटुंबाच्या संबंधित फोटो शेअर करत राहते.

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नेहा सध्या ‘इंडियन आयडल 12’ या सिंगिंग रियॅलिटी शोची जज आहे. नुकतीच अभिनेत्री नीतू इंडियन आयडलच्या स्टेजवर आल्या होत्या. त्यांनी नेहाला लग्नानंतरचा शगुनही दिला होता. त्यांचे ‘मरजानियां’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे आणि याच्या प्रमोशनसाठीच त्या या शोमध्ये आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-आहा! ‘५२ गज का दामन’ गाण्यावर ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हे देखील वाचा