Sunday, April 14, 2024

बेशरम रंग ते ठुमकेश्वरी, ‘ही’ 5 ट्रेंडिंग गाणी आहेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी योग्य

मंडळी 2023 या नवीन वर्षाकडे आपण लवकरच पाऊल टाकणार आहोत. बॉलीवूडपासून ते सर्व सामान्यपर्यंत प्रत्येकजण आपले जुने वर्ष विसरून नवीन वर्षाची सुरुवात साजरे करण्याच्या तयारीत आहे. बॉलीवूडमध्येही 2022 मध्ये अनेक चित्रपट आलीत, ज्यातील काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. तर मंडळी आज आम्ही तुम्हाला चित्रपटांबद्दल नाही, तर 2022 मध्ये आलेल्या गाण्यांबद्दल सांगणार आहोत, जे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी योग्य आहेत आणि सध्या प्रत्येकाच्या ओठावर आहेत.

बेशरम रंग(पठान)
दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने चांगलाच वाद निर्माण केला आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि लोकांनी या गाण्याला विरोध केला. ‘बेशरम रंग’ वरून कितीही वाद निर्माण झाला असला तरी आज या गाण्याने प्रचंड खळबळ माजली आहे आणि दीपिका-शाहरुख खानच्या या ट्रेंडिंग गाण्यावर चाहते रिल्स बनवत आहे.

ठुमकेश्वरी (भेड़िया)
‘भेडिया’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नसली तरी या चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ मधील या गाण्याने अनेकांची मने जिंकली. जेव्हा जेव्हा हे गाणे वाजते तेव्हा लोक त्यावर जोरदार नाचतात.

डूबे(गहराइयां)
दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘गेहराइयां’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ऍमेझान वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने काही खास कामगिरी केली नाही, पण या चित्रपटातील डूबे हे गाणं चांगलेच गाजले.

हरे राम 2.0 (भूल भुलैया-2 )
कार्तिक आर्यन हा या वर्षातील पहिला अभिनेता होता, ज्याच्या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला. त्यांचा ‘भूल भुलैया’ 2 या चित्रपटाने उत्तम व्यवसाय तर केलाच, पण या चित्रपटातील गाणीही लोकांना प्रंचड आवडली. विशेषत: या चित्रपटाच्या ‘हरे राम-हरे राम’ के 2.0 या टायटल ट्रॅकने लोकांना नाचायला भाग पाडले.

नाच पंजाबन (जुग-जुग जियो)
करण जोहरचा कौटुंबिक मनोरंजन करणारा ‘जुग जुग जिओ’ चित्रपटही प्रेक्षकांना आवडला होता. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर पहिल्यांदाच एका पडद्यावर एकत्र दिसले होते. या चित्रपटातील ‘नच पंजाबन’ हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले आणि या ट्रेंडिंग गाण्यावर अनेक रील बनवण्यात आल्या.(bollywood new year 2023 songs besharam rang to thumkeshwari trending songs are parfect for new year play list)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांना बेधुंद करणारा तेजश्रीचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी

स्टनिंग! भूमिच्या गोल्डन रंगाच्या घाघरामधील फोटोंचा सोशल मीडियावर राडा

हे देखील वाचा