Wednesday, December 6, 2023

का राहिली अक्षय कुमार आणि रवीना यांची प्रेम कहाणी अपूर्ण?

अक्षय कुमार हे जेवढे चित्रपटांमुळे ओळखले जातात, तेवढेच खाजगी आयुष्यामुळे सुद्धा ओळखले जातात.अक्षय कुमार यांचे आपल्या काळात बर्‍याच अभिनेत्रींबरोबर नाते जोडले गेले होते. या यादीमध्ये रवीना टंडनचाही समावेश होता. रविना आणि अक्षय यांच्या प्रेमाची चाहत्यांमध्ये अजूनही चर्चा आहे.

प्रेम, पुन्हा जगण्याची शपथ व फसवणूक बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे हेच चालू आहे. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या नात्याची सुरूवात प्रेमापासून झाली, पण त्याचा शेवट वेदनांनी झाला. त्यापैकी एक म्हणजे अक्षय कुमार. ज्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले,पण शेवटी त्यांनी ट्विंकल खन्नाशी लग्न केले. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या अधुर्या प्रेमाची कहाणी सांगणार आहोत.

अक्षय कुमारने आपल्या काळातल्या अनेक अभिनेत्रींवर प्रेम केले. या यादीमध्ये रवीना टंडनचाही समावेश होता. 

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी मोहरा‘ (1994), ‘खिलाडी योंके खिलाडी‘ (1996), ‘दावा‘ (1997), ‘कीमत‘ (1998) अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मोहराचित्रपटात रवीना आणि अक्षय यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांनी चांगलीच पसंत केली होती. असं म्हणतात, की या चित्रपटानंतर दोघेही जवळ आले. या चित्रपटाच्या अखेरीस या दोघांचेही प्रेम वाढू लागले होते., तिथे रवीना चित्रपट खांदानातील होती, तर अक्षय कुमार हे स्वतःकष्ट करून चित्रपटात आले होते. त्याचा कोणी असा गॉडफादर नव्हता

मोहरा चित्रपटाच्या यशानंतर त्यांचे प्रेम उघडपणे जाणवले. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सगळीकडे होऊ लागल्या. दोघे अनेकदा एकत्र दिसू लागले. कुठे ना कुठे रवीना अक्षय यांसोबतचे प्रेम प्रकरण सर्वांसमोर मांडताना दिसली. अक्षय यांच्या प्रेमात रवीना पूर्णपणे बुडाली होती.

Akshay Kumar and Raveen Tandon in Mohra

असं म्हटलं जात आहे की, रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा साखरपुडा झाला होता. दोघेही लग्नाची योजना आखत होते. चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल खूप आनंद झाला होता, आणि असा विश्वास होता की, दोघे लवकरच लग्नाची बातमी देतील. पण असं म्हटलं जाते की, अक्षय यांच्या फक्त प्रेमापोटीच रवीना आपल्या पीक कारकीर्दीला सोडायला तयार होती. कारण हे सर्व फक्त अक्षय कुमार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ज्या दिवशी रवीना चित्रपट करणे बंद करेल, त्याच दिवशी ते तिच्याशी लग्न करतील.हे रवीनाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.

असं म्हणतात की ,जेव्हा अक्षय हे 3 वर्ष रवीनासोबत डेट करत होते, त्याचवेळी ते आणखी एका अभिनेत्रीला फसवत होते. अक्षय यांचे रवीनाशी संबंध असताना, त्यांनी शिल्पा शेट्टीला डेट करण्यास सुरुवात केली. रवीनाने स्वत: शिल्पाला अक्षय यांच्या समवेत रंगेहात इश्कबाजी करताना पकडले, आणि त्याच वेळी अक्षयचा ब्रेकअप झाला. असेही म्हटले जाते की, 1996 मध्ये रेखा, अक्षय आणि रवीना अभिनीत खिलाडियो का खिलाडीया चित्रपटाने रविना आणि अक्षय यांच्यातील नात्याला तडा जाऊ लागला होता. या चित्रपटाच्या नंतर अक्षय आणि रेखा यांच्या अफेअरची माध्यमात चर्चा होऊ लागली, ज्यामुळे रवीना नाराज झाली.

Akshay Kumar and Rekha in Khiladiyon Ka Khiladi

1998 मध्ये रवीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका मुलाखती दरम्यान अक्षय कुमार यांही याबद्दल खुलेपणाने भाष्य केले होते, त्यात अभिनेत्रीने कबूल केले होते की, तिने अक्षय यांच्याशी साखरपुडा केला होता, पण लग्न केले नव्हते. अक्षय यांच्या जाण्याने रवीना तुटली होती, आणि त्यावेळी अभिनेत्रीने अक्षय कुमार यांच्यावर, उघडपणे फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

अक्षय आणि रविना यांनी ब्रेकअपनंतरही सोबत काम केले होते, पण त्यावेळी दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. त्यावेळी अक्षय हे रवीनासोबत बारूदआणि कीमतचित्रपटात काम करत होते.

Akshay Kumar with is wife Twinkle Khanna

अक्षय आणि रवीना यांच्या ब्रेकअपनंतर शिल्पा शेट्टीने रवीनाची जागा घेतली होती, त्यांच्या प्रेमाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पण त्यावेळीपण, अक्षय यांनी पुन्हा धोका दिला,त्यावेळी अक्षय हे शिल्पाला डेट करत होते,आणि त्याचवेळी अक्षय कुमार हे ट्विंकलला पण डेट करत होते.आणि नंतर शिल्पाला सोडून, अक्षय यांनी ट्विंकलशी लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
२१व्या वर्षीच घेतला सिंगल मदर होण्याचा निर्णय, ‘असा’ रोचक आहे रवीना टंडनचा सिनेसृष्टीतील प्रवास
अजय देवगणच्या ‘या’ आरोपांमुळे खचून गेली होती रवीना टंडन, केला होता आत्महत्येचा प्रयत्न

हे देखील वाचा