Monday, July 1, 2024

जरा इकडे पाहा! ‘या’ प्रसिद्ध गायिकेला गाताना पाहून नाेराचे अश्रू अनावर, व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, नोराने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉलिवूड गायिका बियॉन्सेच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली आहे. बियॉन्से सध्या ‘द रेनेसान्स’ वर्ल्ड टूरवर आहेत. अशा परिस्थितीत नोरा तिचा मित्र आणि हेअरस्टायलिस्ट मार्सेल पेड्रोजोसोबत या कार्यक्रमात पोहोचली. बियॉन्सेच्या काॅन्सर्टबद्दल नॉर किती उत्साही होती हे देखील तिने स्वतः दर्शविले आहे.

मंडळी, नोरा फतेही (nora fatehi) बियॉन्सची खूप मोठी फॅन आहे. अशात गायिकेला काॅन्सर्टमध्ये पाहिल्यानंतर अभिनेत्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती रडू लागली. स्टेजवर बियॉन्सेची एंट्री व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे नोरा आनंदाने जोरात ओरडते आणि भावूक देखील हाेते.

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नोराने सिंगर बियॉन्सेच्या कॉन्सर्टचा प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही, तर नाेराने बेयॉन्सेसाठी एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे, नाेरा सांगते, “हा क्षण माझ्यासाठी ड्रीम कम ट्रू म्हणजेच स्वप्न पूर्ण झालं आहे. आपला आइडियल थेट रंगमंचावर पाहणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे. या दिवसाचा माझ्यासाठी काय अर्थ आहे हे कोणीही समजू शकत नाही. मी विकत घेतलेला पहिला अल्बम 2001 मध्ये डेस्टिनीचा चाइल्ड सर्व्हायव्हर होता, जो मला मिळावा म्हणून मी माझ्या वडिलांना विनवणी केली आणि मला आठवते की, मी ताे अल्बम रोज ऐकायचे. तेव्हापासून मी बियॉन्सेच्या प्रवासाचे अनुसरण केले आहे आणि तिची प्रत्येक गाणी आणि नृत्यला दिनचर्या म्हणून स्वीकारले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नाेरा पुढे म्हणाली, “2003 मध्ये जेव्हा तिचा अल्बम ‘डेंजरसली इन लव्ह’ रिलीज झाला, तेव्हा मी तिच्या प्रेमात पडले. त्या गाण्यांनी मला आजचा कलाकार म्हणून आकार दिला. अशात तिला लाइव्ह पाहून अनेक जुने क्षण आणि अनेक भावना ताज्या झाल्या. आम्हाला या कार्यक्रमात येऊन खूप आनंद झाला आणि प्रत्येक क्षण अनुभवता आला.” असे नाेराने आपल्या पाेस्टमध्ये सांगितले.(bollywood nora fatehi attended beyonce concert actress cried seeing the singer in front of her)

अधिक वाचा-
एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

हे देखील वाचा