Thursday, April 18, 2024

बोल्ड अॅन्ड ब्युटीफूल! अभिनेत्री नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक; एकदा पाहाच

बाॅलिवूड अभिनेत्री नाेरा फतेही सतत या ना त्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने आणि खास करून तिच्या डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे. तिने अनेक आयटम सॉन्गवर डान्स केला आहे. ती सोशव मीडियावर सतत सक्रिय असते. नोरा फतेही एक अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. नोराने नुकतेच फोटोशूट केले आहे.

नोरा (Nora Fatehi) तिच्या बोल्ड डान्ससाठीही ओळखली जाते. नोराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्यासारखा डान्स फार कमी अभिनेत्री करू शकतात. ती अनेक रिऍलिटी शोमध्येही दिसली आहे. तिची स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. नोराने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा खूप माेठा चाहता वर्ग आहे, जे कायमच तिच्या संबधीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

नोराचे नवीन गाणे ‘सेक्सी इन माई ड्रेस’ 23 जून रोजी रिलीज होणार आहे. या गाण्याचा टीझर रिलीज झाला असून नोरा यात तिची जादू दाखवताना दिसत आहे. नोराने तिच्या इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रिसमध्ये नोरा खूप सुंदर दिसत आहे. तिने वेगवेगळ्या फोटोंमध्ये जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना चकित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 31 वर्षांय नोरा फतेही तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे. नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरुवात रोर द टाइगर्स ऑफ सुंदरबन्स या चित्रपटातून केली होती. यानंतर ती बाहुबलीच्या पहिल्या भागात आयटम साँग करताना दिसली होती. नोराने हिंदीसोबतच कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्येही देखील काम केले आहे. सुरुवातीच्या काळात अनेक अपयश पचवणाऱ्या नोराने चिकाटी न सोडता प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि एवढे यश मिळवले आहे. (Actress Nora Fatehi shared a bold photo in a black dress)

अधिक वाचा- 
‘आदिपुरुष’च्या संपूर्ण टीमला जिवंत जाळलं पाहिजे’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक विधान; लगेच वाचा
‘कचरापेटीतलं अन्न खाऊन काढले दिवस’; ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाची कहाणी ऐकून पूजा भट्ट ढसाढसा रडली 

हे देखील वाचा