Wednesday, July 3, 2024

स्वातंत्र्य दिनादिवशीच ‘पिप्पा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टिझर आला समोर, पाहा भारत पाकिस्तान युद्धाचा थरार

देशभरात सध्या स्वातंत्र्यदिनाची धामधूम पाहायला मिळत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या आगामी चित्रपटांची घोषणा करण्याचा धडाका लावला आहे.  15 ऑगस्टच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘पिप्पा’ चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर खूपच दमदार आहे. यामध्ये ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहे. मृणाल ठाकूरचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचा टीझर ३ डिसेंबर १९७१ या तारखेपासून सुरू होतो. भारतीय सैनिक रेडिओवर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रक्षेपण ऐकत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने भारतीय भूमीवर हल्ला केल्याचे सांगितले आहे आणि त्यांनी पाकिस्तानशी युद्धाची घोषणा केली आहे. यानंतर भारतीय लष्कर युद्धाच्या तयारीत दिसत आहे.  

भारतीय इतिहासाची पुनरावृत्ती होत असलेल्या या तयारीत एक संवाद आहे. यामध्ये ईशान खट्टरची व्यक्तिरेखा दिसत आहे. “संपूर्ण इतिहासात कधीही इतर कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी युद्ध लढले गेले नाही. पण आज इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. यानंतर बांगलादेश स्वतंत्र करण्याचे युद्ध सुरू होते. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या रॉय कपूर फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार स्टारर एअरलिफ्टचे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. इशान, मृणाल ठाकूर व्यतिरिक्त यात प्रियांशू पैन्युलीचीही भूमिका आहे. त्याचे संगीत रहमान यांनी दिली आहे हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट ‘द बर्निंग चाफीज’ या पुस्तकावर आधारित आहे.
‘पिप्पा’ ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या ‘द बर्निंग चाफीज’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा रविंदर रंधावा, तन्मय मोहन आणि मेनन यांनी लिहिली आहे. ईशानने 45 व्या कॅव्हलरी टँक स्क्वॉड्रनच्या कॅप्टन मेहताची भूमिका केली आहे, जो 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताच्या पूर्व आघाडीवर लढला ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली.

हेही वाचा – ‘आता शांत झोप माझी माऊली…’, अभिनेत्री अमृता खानविलकरवर कोसळला दुखःचा डोंगर
पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी ‘लायगर’चा नवीन पोस्टर रिलीज, तिरंग्यासमोर शर्टलेस दिसला विजय देवरकोंडा
प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

हे देखील वाचा