Friday, April 19, 2024

‘आता शांत झोप माझी माऊली…’, अभिनेत्री अमृता खानविलकरवर कोसळला दुखःचा डोंगर

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या आगामी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या अमृतासाठी एक दुखःद बातमी समोर आली असून तिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्याबद्दलची भावूक पोस्ट अमृता खानविलकरने शेअर केली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र सध्या अमृता खानविलकरवर दुखःचा डोंगर कोसळला असून तिच्या मावशीचे दुखःद निधन झाले आहे. अमृताने सोशल मीडियावरुन ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिचे सांत्वन केले आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अमृताने “आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा. छान रहा. नीट रहा, आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील तू परत लहान होऊन जा. तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी,  आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा.मी  अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ तुला खूप मिस करणार ग तुला. खूप अजून आपल्याला किती फिरायचं होतं, बोलायचं होतं. मॉम ला. मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं, पण माऊ तू नीट राहा आता, तू काळजी करू नकोस.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

दरम्यान अमृताच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता खानविलकर लवकरच झलक दिख ला जा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे.

हेही वाचा – पाकिस्तानात जन्मूनही भारताचे नागरिकत्व घेणारा अदनान सामी, चार लग्नांमुळे आलेला चर्चेत
प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

‘बॉर्डर’ चित्रपटानंतर २४ तास जे. पी. दत्तांसोबत असायचे बॉडीगार्ड; येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या 

हे देखील वाचा