Thursday, March 5, 2026
Home अन्य दु:खद! लोकप्रिय कॉमेडियन कोचू प्रेमन यांचे निधन, वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दु:खद! लोकप्रिय कॉमेडियन कोचू प्रेमन यांचे निधन, वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेते केएस प्रेमकुमार यांचे शनिवारी (दि. 3 डिसेंबर)ला निधन झाले. ते बरेच दिवसांपासून आजारी होते. कोचू प्रेमन या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याने वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनामुळे कलाविश्वाात शाेककळा पसरली आहे.  

अभिनेत्याने 1979मध्ये मल्याळम चित्रपटांमधून केले पदार्पण 
अभिनेता कोचू प्रेमन (kochu preman) हे मल्याळम चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध अभिनेता होते, ज्यांनी टेलिव्हिजन तसेच चित्रपटांच्या जगात खूप प्रसिद्धी मिळवली. कोचू प्रेमन यांनी आपल्या करिअरची सुरुवात नाटक कलाकार म्हणून केली होती. अनेक वर्षे नाटकांमध्ये काम केल्यानंतर  अभिनेत्याने 1979 मध्ये मल्याळम चित्रपटांमधून पदार्पण केले, परंतु 90 च्या दशकातच ते प्रसिद्ध झाले.

अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये 250 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
कोचू प्रेमन हे चित्रपटांमधील कॉमेडी टायमिंगसाठी ओळखले जात होते. गेल्या दोन दशकांत त्यांनी सातत्याने चित्रपटांमध्ये काम केले. इतकेच नाही, तर टीव्ही मालिकांमध्ये काम करून या अभिनेत्याने घराघरात ओळख मिळवली. कोचू प्रेमन यांनी आपल्या करिअरमध्ये 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

काेचू प्रेमन दाेन दशके चित्रपटांमध्ये राहिले सक्रिय
कोचू प्रेमन यांनी विनोदी भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि गेली दोन दशके चित्रपटांमध्ये सक्रिय राहिले. अभिनेत उंचीने लहान हाेते, पण विनोदी भूमिका साकारताना त्याची उंची कधीच अडथळा ठरली नाही. ते त्यांच्या विनाेदी कलेसाठी ओळखले जायचे.

अभिनेत्याच्या निधनावर मुख्यमंत्रीनं व्यक्त केला शाेख
तिरुअनंतपुरममधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याचे शनिवारी (दि. 3 डिसेंबर)ला निधन झाले. मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि विरोधी पक्षनेते व्हीडी साठेसन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.(bollywood popular comedian kochu preman passed away at 68)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
साजिद खान रमला एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत, बोलता-बोलता अंकितला सांगून बसला फिलिंग्स

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर पुन्हा साधला निशाणा; म्हणाली, ‘राजकारण्यांचे संगनमत सुद्धा…’

हे देखील वाचा