Tuesday, January 31, 2023

साजिद खान रमला एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत, बोलता-बोलता अंकितला सांगून बसला फिलिंग्स

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16‘ प्रत्येक भागासह अधिक मनोरंजक होत आहे. जिथे स्पर्धक स्वतःला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यापासून वाचवण्यासाठी वेगवेगळे गेम खेळत आहेत. त्याचवेळी, शोमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे आणि जोरदार वादावादी पाहायला मिळत आहे, ज्यासाठी सलमान खान सर्व स्पर्धकांना फटकारताना दिसत आहे. अलीकडेच शोमध्ये प्रियंका चहर आणि अंकित गुप्ता यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळाले, त्यानंतर साजिद खान याने अंकितला सपोर्ट करताना आपले जुने प्रेम आठवले.

वास्तविक, गेल्या एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले होते की, अंकित (ankit gupta) सौंदर्या शर्मा (soundarya sharma) हिच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड प्रियंका (priyanka chahar choudhary) विषयी बोलताना म्हणतो की, “ती नेहमी गेमबद्दल बोलत असते.” बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा प्रियांकाचा राग अंकितवर भडकला आणि दोघांमध्ये खूप वाद झाला, पण अंकित प्रियांकाला पुन्हा पुन्हा समजावत होता. ही संपूर्ण घटना पाहिल्यानंतर साजिद खान (sajid khan) याला त्याच्या जुन्या प्रेयसीची आठवण आली.

या संपूर्ण घटनेनंतर साजिद खानने अंकितला समजावून सांगितले आणि म्हणाला, “इतक्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नकोस. मीही या टप्प्यातून गेलो आहे. मी सुद्धा रिलेशनशिपमध्ये होतो, जिथे लाेक हायपर व्हायची”, पण नंतर अंकित साजिदला सांगतो की, “आम्ही दोघे फक्त मित्र आहोत, आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही” आणि या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा साजिद खान लाेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

साजिद खान आपल्या बोलण्यामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तो बिग बॉसच्या घरात त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे चर्चेचा विषय ठरला हाेता. अलीकडेच, तो बिग बॉसच्या घरात नो स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपान करताना दिसला, ज्यावर सलमान खानने त्याला जोरदार फटकारले हाेते.(bigg boss 16 sajid khan remembers his ex girlfriend talks about condition of his heart to ankit gupta)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
लग्नाच्या 18 वर्षानंतर हे कलाकार जाेडी पहिल्यांदाच झाले आई-बाबा, शेअर केला मुलीचा व्हिडिओ

‘हेरा फेरी 3’ बद्दल मोठे अपडेट! चित्रपटात काम करण्यासाठी कार्तिक आर्यनने ठेवली ‘ही’ अट

हे देखील वाचा